Rajysabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजप चौथा उमेदवार देणार का? बावनकुळेंनी केले सूचक विधान

Chandrashekhar Bawankule on Rajysabha : बावनकुळे म्हणाले, राज्यसभेसाठी भाजपकडून चौथा उमेदवार दिला जाणार नाही, निवडणुका बिनविरोध होतील
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Rajyasabha Election : राज्यसभेसाठी राज्यातून 6 रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. महायुतीच्या वाढलेल्या ताकदीमुळे ही निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज होता. परंतु ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपकडून चौथा उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी येत्या महिना अखेर 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी15 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून राज्यातून सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वाट्याला 5 जागा आल्या आहेत. त्यापैकी भाजपने राज्यसभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक उमेदवार दिला जाणार आहे. या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule
Rajya Sabha Election 2024: मोदी- शाह यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र; चर्चेतल्या नावांना कात्री तर 'सरप्राईज'...

दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajysabha Election) काँग्रेसच्या वाट्याला एक जागा असून त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. संख्याबळाचा विचार करता काँग्रेसकडूनही एकच उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सहाही उमेदवारांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग बिनविरोध झाला आहे. दरम्यान, भाजपकडील संख्याबळाचा विचार करता आपण चौथा उमेदवार देणार नसल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. सर्वच पक्षांकडे ठराविक संख्याबळ असताना निवडणुकीत चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवण्याची गरज नसल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मंगळवारीच पक्षात प्रवेश केलेले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्यासह हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा असतानाही त्यांचा पत्ता कट कापण्यात आला आहे. दरम्यान, भाजपने चौथा उमेदवार देणार नसल्याने या नेत्यांची उरली-सुरली आशा देखील संपुष्टात आली आहे.

Chandrashekhar Bawankule
Loksabha Election 2024 : मेधा कुलकर्णींना राज्यसभेची 'लॉटरी'; पुणे लोकसभेसाठी आता 'मराठा' उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com