Raosaheb Danve News : थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय; रावसाहेब दानवे म्हणतात, पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये लोकसभा लढवणार!

aosaheb Danve, a prominent political leader, states that he will contest the Lok Sabha elections again if his party gives him the opportunity. : मला पक्षाने खूपकाही दिलेले आहे. माझे दोन मुलं आमदार आहेत, असे सांगतानाच जर पक्षाने संधी दिली तर मी पुढची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political : राजकारणात निवृत्ती नसते असं म्हणतात. आतापर्यंत देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या राजकीय नेत्यांच्या वयावर नजर टाकली तर ते स्पष्ट होते. हे क्षेत्र महत्वाकांक्षी लोकांसाठीचे म्हणून ओळखले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वयाची ऐंशी वर्ष पुर्ण केल्यावरही तरुणांना लाजवतील अशा उत्साहात राज्य आणि देशाच्या राजकारणावर आपली छाप कायम राखून आहेत. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे सलग पाच वेळा खासदार, दोन वेळा आमदार राहिलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी 2029 ची लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचे विधान केले आणि राजकारणात वाढते वय इच्छाशक्तीच्या आड येत नाही हे पुन्हा स्पष्ट झाले. मी राज्यसभेवर आणि विधानसभेवर जाणार नाही. मला पक्षाने खूपकाही दिलेले आहे. माझे दोन मुलं आमदार आहेत, असे सांगतानाच जर पक्षाने संधी दिली तर मी पुढची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

दानवे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी दानवेंनी मात्र थांबायचं नाय गड्या आता थांबायचं नाही, असेच ठरवल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य आणि देश पातळीवरच्या राजकारणावरही दानवे यांनी आपली मते मांडली.सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील त्यांचे विरोधक अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याबद्दल विचारले तेव्हा अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात मी नाही. मात्र त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, मतदारसंघातील लोक नाराज आहेत.

Raosaheb Danve News
Abdul Sattar News : पालकमंत्री शिरसाट यांचे आव्हान अन् किरीट सोमय्या यांचा सिल्लोड मध्ये हस्तक्षेप; तरी अब्दुल सत्तार गप्प का!

एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनाच लाभ दिल्या जातो. इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा आहे. मी देखील त्यांचा विरोध करतो. सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे दानवे म्हणाले. मागच्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमध्ये फक्त गोल टोपीवाल्यांना पपेट्रोल आणि डिझेल दिले जात होते. इतर लोक भोकरदमधून पेट्रोल, डिझेल घेऊन जात होते, असा गंभीर आरोपही रावसाहेब दानवे यांनी केला.

Raosaheb Danve News
Raosaheb Danve News : 'रावसाहेब दानवे सिर्फ नाम ही काफी है', माजी म्हणून हिणवणाऱ्या चंद्रकांत दानवेंना टोला!

सिल्लोडच्या प्रत्येक चौकाचे नाव काय आहे ते पहा ना? सुभाष चंद्र बोस याचं नाव, महात्मा गांधी, शामाप्रसाद मुखर्जी यांची नावे नाहीत. जी नाव आहे, त्यावर नजर टाकली तर त्या गावाची रचना, यांची विचारधारा कशी आहे कळते. खायचं इकडचं गायचं दुसऱ्याचं, म्हणूनच मी आजही म्हणतो की सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे. सिल्लोडच्या मोक्याच्या जागा सत्तेच्या जोरावर नगरपरिषदेत घेतल्या गेल्या, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.

Raosaheb Danve News
BJP Vs Congress: काँग्रेसकडून सपकाळांचं नाव जाहीर होताच भाजपचा पहिला वार; मुख्यमंत्रिपदासाठी 10 नेते शर्यतीत,पण प्रदेशाध्यक्ष...

अब्दुल सत्तार यांना महायुती सरकारमध्ये मंत्री पद का मिळू शकले नाही? या प्रश्नावर अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचे मंत्रीपद गेले अस, असा आरोपही दानवे यांनी करत सत्तार विरोधातील धार अधिक तेज केल्याचे दाखवून दिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुती असूनही उघडपणे महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचे काम केले होते. तेव्हापासून सत्तार-दानवे यांच्यात वितुष्ट आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com