उRashtriya Samaj Paksha and Vidhan Sabha Election : राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागल आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सत्ताधारी महायुती किंवा विरोधातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अद्याप जागा वाटप झालेलं नाही. परंतु सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी रणनिती आखत आहेत. अशावेळी महायुतीचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षानेही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली भूमिका जाहीर, करत महायुतीला सूचक इशारा दिला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी पत्रकारपरिषदेत या पार्श्वभूमीवर बोलाताना सांगितले की, '29 ऑगस्टला आपल्या पक्षाचा 21 वा वर्धापन दिन अकोला येथे होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात बैठका सुरू आहेत. विधानसभानिहाय बैठका सुरू आहेत. किमान 50 हजार लोक अकोल्यात 29 ऑगस्टला एकत्र येतील, अशारित्याने आमचं काम सुरू आहे. आता सध्या राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा भाग आहे. लोकसभेसाठी महायुतीने मला जागा सोडली होती. पण दुर्दैव माझा त्यात पराजय झाला. महाराष्ट्रात असं आहे की प्रत्येक लोकसभा निवडणूक मी लढतो, काही दिवसच त्या जिल्ह्यात जातो आणि पावणेपाच लाख मतदान घेतो.'
याचबरोबर 'मी नांदेड, सांगली, म्हाडा, बारामती आणि यंदा परभणी लोकसभा निवडणूक मी लढवली. माझी मतदानाची टक्केवारी वाढत चालली आहे. पक्षाची ताकदही वाढत आहे. माझ्या पक्षाचे नगरसेवक आहेत, चार राज्यात मला कायदेशीरित्या मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात चार आमदार आले आहेत. नगरसेवक आहेत, जिल्हापरिषद सदस्य आहेत. उत्तर प्रदेशातही आमची मतदानाची टक्केवारी चांगल्याप्रकारे वाढलेली आहे. गुजरातमध्ये आमच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. बडोदा या ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे. कर्नाटकातही आम्ही विजयी झालेलो आहोत.'
'महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात या चार राज्यात पक्षाला जी टेक्निकली मान्यता लागते, ती आम्ही मिळवलेली आहे. आता जवळजवळ 27 राज्यांमध्ये आम्ही पक्ष वाढवलेला आहे. कालच मी आधी गुजरातला होतो तिथून पंजाबला गेलो मग दिल्लीहून आज महाराष्ट्रात आलो आहे.' अशी माहिती जानकरांनी दिली.
याशिवाय, 'महायुतीत आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. महायुतीत आम्हाला सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर 288 जागा लढवण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. 288 पैकी 50 जागा महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाला सोडाव्यात. असा आमचा त्यांना आग्रह आहे.'
तसेच, 'मुंबईमध्ये एक नाही तर बऱ्याच जागा मी लढवणार आहे. शिवाजीनगरची जागा लढवणार आहे. नेहरुनगर, मानखूर्द अशा दोनचार ठिकाणी आमची तयारी सुरू आहे.' असंही महादेव जानकर यांना यावेळी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.