Sanjay Raut : उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचा चेहरा; संजय राऊतांच्या घोषणेने आघाडीत बिघाडी होणार?

Uddhav Thackeray will be Face Of Maharashtra : आम्ही महाविकास आघाडी म्हणून 180 किंवा त्याहून जास्त जागा जिंकू. महाराष्ट्राला उद्धव ठाकरे हवे आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी सर्व पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात सध्या सर्व पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. तत्पुर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौराही केला.

त्यानंतर ठाकरे गटाच्या ठाण्यातील भगवा सप्ताहात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचा चेहरा असतील, असे जाहीर केले. राऊतांच्या या विधानाने महाविकास आघाडीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, असे वारंवार विचारले जाते. त्यावर एकीकडे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे उत्तरे मिळतात. असे असतानाही संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्राचा चेहरा हा फक्त उद्धव ठाकरेच आहे, असे जाहीरपणे सांगितले. त्यावर आता आघाडीतील इतर घटक पक्षांच्या काय भूमिका असणार, याकडे लक्ष आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून 180 किंवा त्याहून जास्त जागा जिंकू. महाराष्ट्राला उद्धव ठाकरे हवे आहेत. लोक विचारतात, तुमचा 'फेस' कोण आहे? त्यांना सांगतो, की ज्यांनी गेल्या पाच वर्षांत दिल्लीश्वरांच्या तोंडाला फेस आणला ते आमचा चेहरा आहे. तो 'फेस' म्हणजे उद्धव ठाकरे.

राज्यातील इतर कुणाच्यातही दिल्लीश्वरांच्या तोंडाला फेस आणण्याची हिमंत नव्हती, ती उद्धव ठाकरेंनी केली. या राज्याला उद्धव ठाकरेंशिवाय 'फेस' आहे का? बाकी सर्व मुखवटे घालून फिरत आहेत. मुखवटे यांचे पण चेहरा मात्र आब्दालीचा. खाली दाढी दिसते आहे, असे म्हणत नाव न घेता राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com