मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणारे आमदार रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना १७ दिवस तुरुंगात काढावे लागले. (Mla Ravi Rana) न्यायालयाने मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्य करू नयेत, अशी तंबी देऊन जामीन दिला. मात्र राणा दाम्पत्य काही केल्या मुख्यमंत्र्यावर (Cm Uddhav Thackeray) टीका केल्याशिवाय राहत नाहीयेत.
मुंबईच्या खार येथील फ्लॅटच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर आता इमारतीतील इतर फ्लॅटधारकांच्या घरांची देखील पथकाकडून पाहणी केली जात आहे. (Maharashtra) यावर खवळलेल्या आमदार रवि राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले.
राज्यात शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. याचे-त्याचे फ्लॅट मोजण्याने काहीही होणार नाही, त्यापेक्षा राज्यातील जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, असा टोला राणा यांनी लगावला आहे.
गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राणा दाम्पत्य आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन १७ दिवस जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर तर राणा दाम्पत्य अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
तिकडे मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने देखील ऐनकेन प्रकारे या दाम्पत्याला त्रास देणे सुरूच ठेवले आहे. मुंबईतील राणा यांच्या निवासस्थानात अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेने कारवाईची तयारी चावली आहे. याच दरम्यान, राणा यांच्या मुंबईतील खार येथील फ्लॅटवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या पथकाने इतर लोकांच्या घरांची देखील पाहणी केली.
यावरून रवि राणा चांगलेच संतपाले, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना त्यांना सल्ला देखील दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना रवि राणा म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे-त्याचे फ्लॅट मोजण्यापेक्षा या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, ते सोडवावेत असा माझ्या त्यांना सल्ला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.