

KDMC News : कल्याण - डोंबिवलीच्या राजकारणात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात युती असली, तरी स्थानिक पातळीवर भाजपा विरुद्ध शिवसेना-मनसे असे राजकीय शीतयुद्ध रंगताना दिसत आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली जात असतानाच आता चव्हाण यांनीही पाटील यांचे नाव न घेता त्यांना सूचक टोला लगावला आहे.
डोंबिवली पूर्वेतील एका आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. त्यावेळी त्यांनी ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणींचा उल्लेख केला. चव्हाण यांच्या या वक्तव्याचा रोख मनसे नेते राजू पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजपा, शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय समीकरणांवरही चव्हाण यांनी भाष्य केले. मनसे नेते राजू पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील मैत्रीचा संदर्भ देताना त्यांनी ही मैत्री ‘शोले’ चित्रपटातील जय-वीरूच्या मैत्रीसारखी असल्याचे सूचकपणे सांगितले. मात्र, या मैत्रीत धोका मनसेलाच अधिक असल्याचेही त्यांनी अस्पष्टपणे नमूद केले.
भाजपा आणि मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. युती कायम असतानाही स्थानिक पातळीवरील कुरघोडी आणि राजकीय टोलेबाजीमुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या ताज्या वक्तव्यानंतर राजू पाटील काय भूमिका मांडतात आणि शिवसेना शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.