Chandrakant Patil On Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच हे योग्य नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Chandrakant Patil reaction to Harshvardhan Patil leaving the BJP : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात केलेल्या प्रवेशावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा जाण्याच्या निर्णयानंतर इंदापूरमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयाचे धक्के भाजपला चांगलेच जाणवू लागलेत. यावर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"दरवेळी प्रमाणे मी माझ्या लोकांना विचारून निर्णय घेतला, असं म्हणणं हर्षवर्धन पाटलांच योग्य नाही, शेवटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजून सांगत असतो", असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला राम राम करत आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित इंदापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांच्या या पक्षप्रवेशाचे हादरे भाजपला बसलेत. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Harshvardhan Patil
Rahul Gandhi And Avinash Pandey : राहुल गांधीमध्ये दैवी शक्तीचं अस्तित्व; संघभूमीत 'या' नेत्याचं विधान

भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, "हर्षवर्धनजी आणि आमच्या काही राग नाही, हर्षवर्धन पाटील यांना पक्षाने खूप काही दिलं. अमित भाईंनी आणि देवेंद्र फडणसांनी देखील खूप प्रेम केलं. पण काही विधानं करणं चुकीचं आहे". दरवेळीप्रमाणे मी माझ्या लोकांना विचारून निर्णय घेतला, असं म्हणणं हर्षवर्धन पाटलांच म्हणणं योग्य नाही. शेवटी निर्णय आपण आपला घेत असतो. त्यानंतर लोकांना समजावून सांगत असतो, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला आहे.

Harshvardhan Patil
Video Raj Thackeray : 'राजकारण्यांनी जाळी नसलेल्या इमारतीवरून उडी मारली पाहिजे' राज ठाकरेंची खोचक टीका

चंद्रकांत पाटील यांनी राजकारण्यामधील महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवत हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'राजकारणामध्ये महत्त्वकांक्षा ही नात्यांच्यावर तत्त्वांच्यावर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. आमचं जीणं, मरणं इथंच आहे. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं', असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com