Video Raj Thackeray : 'राजकारण्यांनी जाळी नसलेल्या इमारतीवरून उडी मारली पाहिजे' राज ठाकरेंची खोचक टीका

Raj Thackeray on Maharashtra Politics : राज ठाकरे यांनी निवडलेल्या बोधचिन्हाचे अनावरण आज करण्यात आलं याप्रसंगी त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोलताना सरकारला चिमटे काढले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सरहद संस्थेच्या वतीने साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. राज ठाकरे यांनी निवडलेल्या बोधचिन्हाचे अनावरण आज करण्यात आलं याप्रसंगी त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोलताना सरकारला चिमटे काढले.

राज ठाकरे म्हणाले, माझ्या आयुष्यातलं सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर काय बोलावं. अश्या ठिकाणी आमची काय गरज असते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल ते वाढवण्यासाठी आम्ही आहोतच. महाराष्ट्रातले साहित्यिक केले अनेक वर्ष मी पाहत आलो आहे.

Raj Thackeray
Rahul Gandhi And Avinash Pandey : राहुल गांधीमध्ये दैवी शक्तीचं अस्तित्व; संघभूमीत 'या' नेत्याचं विधान

मराठी बाणा ज्याला जो मानतो तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात रुजलेला असायचा सांगणे ते राजकारणांना बिघडलेल्या गोष्टी ठणकावून सांगायचे.धमक काही वर्षांपूर्वी साहित्यांमध्ये होती ती आज कमी दिसत आहे असे निश्चित वाटतं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा सगळा खेळ झाला आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषक झाले आहेत कोणी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारतात. खरतर काही राजकारण्यांनी इमारतीला जाळी नसलेल्या ठिकाणी उडी मारली पाहिजे अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली.

Raj Thackeray
Harshavardhan Patil : जयंतरावांची ऑफर अन् सुळेंना लोकसभेला अदृश्य मदत; 'तुतारी' हाती घेताच हर्षवर्धन पाटलांची जोरदार बॅटिंग

महाराष्ट्राचे राजकीय भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे की, यांना समजावणे, सांगणे, आणि कान धरण्याचे काम साहित्याकांचे आहे. ते करणे अत्यंत आवश्यक असल्याचे राज ठाकरे म्हणले. ज्या भाषेमध्ये लोक बोलत आहे हीच भाषा म्हणजे राजकारण असं राजकारण येऊ घातलेल्या नव्या पिढीला वाटायला लागलं आहे. महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त अधपतन होण्याचं श्रेय कोणाचा असेल तर ते माध्यमांचा आहे. लोक वाटेल ते बोलतात ते हे दाखवतात. जेव्हा हे दाखवनं बंद करतील तेव्हा हे बंद होईल असं राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com