Rohidas Patil Death : खान्देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

Senior Congress Leader Former Minister Rohidas Patil Passed Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
Rohidas Patil
Rohidas PatilSarkarnama
Published on
Updated on

Dajisaheb Rohidas Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं आज वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. आज (शुक्रवारी) सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पाटील यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत विविध खात्यांमध्ये मंत्रीपद भुषवलं आहे. खान्देशात स्वत:चे वेगळे वलय त्यांनी निर्माण केलं होतं. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भुषवलं होतं. रोहिदास पाटील यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते.

ते गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. अखेर शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे धुळे जिल्हासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे. रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Rohidas Patil
Sudhir Mungantiwar Video : "संजय राऊतांना दुसरा कामधंदाच नाही..."; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता धुळ्यातील देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल आणि एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी, सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com