Sudhir Mungantiwar Video : "संजय राऊतांना दुसरा कामधंदाच नाही..."; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar On Mahavikas Aghadi : "छत्रपतींचा पुतळा पडला याचे वाईट आम्हालाही वाटते. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, याचे राजकरण करणे योग्य नाही."
Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Sanjay Raut, Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 27 Sep : शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत रोज महायुतीच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप करतात. नवनवे गौप्यस्फोट करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर 'सकाळचा भोंगा' अशी टीकाही केली जाते.

राऊतांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे भाजपचे (BJP) नेते कितीही म्हणत असले तरीही त्यांची दखल घ्यावीच लागते. अशातच शुक्रवारी (ता.27सप्टेंबर) राज्याचे वनमंत्री व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत हे चांगले कपोलकल्पित कथाकार असून त्यांना दुसरा कामधंदाच नसल्याची टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, कोणावरही बेछुट आरोप करणारे संजय राऊत तोंडघशी पडले आहेत. न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे. यातून त्यांनी धडा घ्यावा. कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी केल्याने काय होते, हे त्यांना आता समजले असेल. ‘सामना‘मधून मनाला येईल ते लिहीत असतात.

Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Bjp Vs Shivsena : भाजपला मोठा धक्का बसणार! भास्कर जाधवांच्या मध्यस्तीनं बडा नेता ठाकरे गटात?

टीका करणे हा त्यांचा एकमेव व्यवसाय आहे. आपल्या वर्तमानपत्रातून त्यांनी कधी विकासावर, गोरगरिबांवर लिखान केले नाही. कपोलकल्पित कथा रचून संजय राऊत (Sanjay Raut) मतदारांची सहाभूती मिळवण्याचा आणि पुन्हा सत्तेवर येण्याचा अपयशी प्रयत्न करीत असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

छत्रपतींचा पुतळा पडला याचे वाईट आम्हालाही वाटते. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, याचे राजकरण करणे योग्य नाही. छत्रपतींचा वापर सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी विरोधकांमार्फत केला जात आहे.

Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Sanjay Kaka Patil : सांगलीत राजकारण पेटलं! संजयकाका पाटलांची दादागिरी; माजी उपनराध्यक्षांना घरात घुसून मारहाण

भास्कर जाधवांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही. ते प्रत्येक घटनेचे भांडवल करतात. लाडकी बहीण योजनाही त्यांना नकोशी आहे. सत्तेत नसल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची उपासमार होत आहे. त्याकरिता त्यांना सत्ता हवी आहे, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com