Rohini Khadse On Pranjal khewalka Arrest : पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची 24 तासानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'योग्य वेळ...'

Rohini Khadse Pranjal khewalka Pune Rave Party : प्रांजल खेवलकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रांजल यांच्या अटकेवर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 Rohini Khadse  Pranjal khewalka
Rohini Khadse Pranjal khewalka sarkarnama
Published on
Updated on

Rohini Khadse News : पुण्यात रेव्ह पार्टी करताना आमदार एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अटक केली. प्रांजल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

प्रांजल यांच्या अटकेनंतर तब्बल 24 तासानंतर त्यांच्या पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहिणी खडसे यांनी फेसबूकवर पोस्ट करत आपल्या प्रांजल यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. जय महाराष्ट्र!' दरम्यान, आज रोहिणी खडसे या सकाळी 11 वाजता पुण्याच्या आयुक्तांची भेट घेणार आहे.

एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रया देताना म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरु आहे, त्यानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मलाही येत होता. मात्र माझे जावई यात दोषी असतील तर त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावत म्हटले की, जावई का लहान बाळ आहे का? त्याला कडेवर तेथे न्यायला?

 Rohini Khadse  Pranjal khewalka
Ajit Pawar Tanpure Controversy : 'तनपुरे वाड्या'वर बंद दाराआड बरचं काही घडलं, अजितदादांनी पुढचं राजकाराण पेरलं!

दोन दिवसांची पोलिस कोठडी

खराडी पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रांजल खेवलकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रांजल यांचे वकीलांनी न्यालायलात दावा केला की प्रांजल यांनी कोणतेही ड्रग्ज घेतले नव्हते. पोलिसांनी प्लॅन करून त्यांना अटक केली आहे.

 Rohini Khadse  Pranjal khewalka
Maharashtra Politics: आमदारांच्या योग्यता पडताळणी मोहीमेत आढळली ही 'बिनबुडाची' तथ्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com