
Rohit Pawar latest statement :औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना, सोमवारी रात्री राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर शहर अचानक पेटलं. दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळला आणि त्याचं रूपांतर भीषण दंगलीत झालं. त्यानंतर मग प्रचंड दगडफेक, वाहनांची जाळपोळ सुरू झाली.
नागपूरच्या(Nagpur) हिंसाचारात तीन डीसीपींसह एकूण 33 पोलिस जखमी झाले आहेत. एका डीपीसीवर तर थेट कुऱ्हाडीने वार करण्यात आलेला आहे. यावरून विरोधकांनी आता सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवाय, भडाकाऊ भाषण करणाऱ्या मंत्र्याचा तत्काळ राजीनामा घेतला जावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, नागपूरच्या या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत, राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार(Rohit Pawar) यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''अखेर सामान्य माणसाची डोकी फोडून, जीव घेऊन, वाहने जाळून आणि घरं पेटवून सरकारने नेमकं काय साध्य केलं? नागपूरमधील राडा हा गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम असून याला सर्वस्वी हे सरकार कारणीभूत आहे. राज्यातील वातावरण दूषित करून जातीय आणि धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या मंत्र्याची सरकारमधून हकालपट्टी झाली पाहिजे… एवढंच नाही तर या सरकारलाही एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.''
तसेच ''नागपूरमधील दंगलीच्या निमित्ताने सरकारला जे हवं ते मात्र साध्य झालं. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, बेरोजगार यांचे मुलभूत प्रश्न बाजूला पडले. हे प्रश्न सुटले असते तर त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असता पण या घटकांच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठीच राज्यात सरकार पुरस्कृत धार्मिक आणि जातीय धुडगूस सुरु असून दुर्दैवाने राज्यातील जनतेला हा सर्व नंगानाच हतबलपणे बघण्याची वेळ आलीय.'' असं रोहित पवार म्हणाले आहेत.
याशिवाय ''माझी महाराष्ट्राला विनंती आहे की, जातीय-धार्मिक तेढ आपल्याला कधीही परवडणारी नाही. यात पेटवणारे हात नामानिराळे राहतात आणि बळी मात्र सामान्य माणसाचा जातो. त्यामुळं नागरिकांनी शांतता राखावी!'' असं आवाहनही रोहित पवारांनी केलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.