Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदेंनी माफी मागावी..., रोहित पवार संतापले; म्हणाले, 'चुकीचंच नाही तर अनादर...'

Rohit Pawar Ram Shinde BJP NCP : राम शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. शिंदे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rohit Pawar News : महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विधीमंडळा दोन सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. विधान परिषदेसाठी काँग्रेसने सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव देऊनही त्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना ‘‘स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या प्रथा आज सुरु असणं अभिप्रेत आणि अपेक्षित नाही,’’ असे विधान हे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले, 'सभापती राम शिंदे यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणारं आहे. हाच निकष प्रा. राम शिंदे हे ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या विधानपरिषदेलाही लावणार का? कारण विधानपरिषदेची स्थापना ही स्वातंत्र्यापूर्वी १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार तत्कालीन मुंबई प्रांत असताना झाली.'

पुढे ते म्हणाले की, संवैधानिक पदावरील व्यक्तीने विरोधी पक्षनेतेपदाबाबत असं विधान करणं हे केवळ चुकीचंच नाही तर लोकशाहीचा अनादर करणारं आहे. याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा मार्ग करणार मोकळा; 125 जागांच्या प्रस्तावाने भाजपची कोंडी?

सरकार संविधान विरोधी

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्याचा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते या संवैधानिक पद असताना त्यावर नेमणूक होत नाही. हे सरकार संविधान विरोधी आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Tukaram Munde: 'तुकाराम मुंढे'मुळे अधिवेशन गाजणार; भाजपचे आमदार आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.