Rohit Pawar : उपमुख्यमंत्री फडणवीस, आमदार शिंदेचा एमआयडीसीला विरोध; आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Nagpur winter session : आमदार रोहित पवार हे नागपूर विधानभवनात एमआयडीसीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न छापलेले जॅकेट घालून दाखल झाले.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

winter session : कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी प्रश्नांवरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात युद्ध भडकले आहे. एमआयडीसीसाठी निश्चित केलेली जागा ही नीरव मोदीची असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे लावला होता. यासाठी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. यावर आमदार रोहित पवार हे नागपूर विधानभवनात एमआयडीसीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न छापलेले जॅकेट घालून दाखल झाले. कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी रोखल्याच्या मुद्यावरून त्यांनी उपमुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रा. राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी जिथे प्रस्तावित झाली आहे तेथेच होईल, असे आव्हान दिले आहे. राजकीय द्वेषातून ही कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी होऊ दिली जात नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर एमआयडीसी होऊ नये यासाठी दबाव आहे. आयोजित बैठकीत आमदार राम शिंदे यांनी एमआयडीसीवर कोणतीही चर्चा केली नसून, फक्त मंत्र्यांसोबत फोटोपुरते होते, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
Dhananjay Mahadik: 'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान...'; खासदार महाडिकांचा हल्लाबोल

आमदार प्रा. राम शिंदे हे मंत्र्यांच्या दालनात एमआयडीसीला विरोध करत फिरत आहेत. नको तिथे डोके घालत आहे. गरिबाला अडचणीत आणत आहेत. मंत्र्यांबरोबर छायाचित्र काढून घेऊन माध्यमांमध्ये दिशाभूल करणारी माहित देत असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला. ही जागा नीरव मोदीची आहे, असा आरोप माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी केला होता. यावर आमदार रोहित पवार यांनी त्यांना बोलवा. समोरा-समोर चर्चा करायला तयार आहे. आज तीन वाजताची वेळ ठरवा. मी कागदपत्र आणतो. त्यांनी देखील आणावीत. आहे का हिमंत पाहू. दाखवा नीरव मोदीच जमीन. नीरव मोदी याने जमीन कोण आमदार असताना घेतली ते देखील सांगा. या प्रकरणात ते खोटे नावे घेत आहेत. महिलेचे देखील नाव घेत आहेत. व्हिजन नसलेले लोक एमआयडीसीला विरोध करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात भेटून पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राजकारण बाजूला ठेवा, असे त्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे जावू. सही करून फाईल का बाहेर काढत जात नाही, हे विचारणार. हे राजकीय द्वेषातून ही एमआयडीसी अडवल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर दबाव आहे. परंतु, काही झाले तरी, कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी जिथे आहे, तिथेच होईल. मुख्यमंत्री यांचे पद की, उपमुख्यमंत्री पद मोठे हे अधिवेशनात कळेल. उदय सामंत हे मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री यांचे ऐकतात हे कळेल. बैठकीला आमदार प्रा. राम शिंदे जातात. तिथे फोटोपुरते उभे राहतात. या बैठकीत काही डिटेल चर्चा झालेली नाही. परंतु प्रा. राम शिंदे हे डिटेल चर्चा झाल्याचा दावा करत आहेत, तो चुकीचा आहे, असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

जागेबाबत चर्चा करायला तयार

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, 'आम्ही संपूर्ण पाहणी करून ४५० हेक्टर जागा निश्चित केली आहे. तिथे मोठ्या कंपन्या याव्यात आणि त्या माध्यमातून २० हजार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने दोन महामार्ग तयार करण्याच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. निश्चित केलेल्या जागेला कुणाचाही विरोध नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीदेखील ती जागा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. केवळ या औद्योगिक क्षेत्रापोटी बागायती जमीन जाऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतने केली होती. त्यानुसार तेवढी बागायती जमीन सोडण्यात आली आहे. ती जमीन नीरव मोदींची आहे की नाही याबाबत चर्चा करायला तयार आहे'.

(Edited by Sachin Waghmare)

Rohit Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का! 'हे' कारण देत प्रस्तावित कर्जत 'एमआयडीसी' रद्दबातल; राम शिंदेंची मोठी माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com