Dhananjay Mahadik: 'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान...'; खासदार महाडिकांचा हल्लाबोल

Kolhapur Politics: काँग्रेसच्या नेत्यांनी देश लुटण्याचेच काम केले, खासदार धनंजय महाडिकांचे टीकास्त्र
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटी रूपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रोकड सापडल्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील खासदार साहू यांच्यावर टीकास्त्र सोडत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनानंतर धनंजय महाडिक यांनी हा निशाणा साधला आहे.

शहर आणि उपनगरांचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, दिर्घकालीन विकास योजना राबवण्याचा मानस आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील कदमवाडी आणि भोसलेवाडी इथं विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Mahadik
Shriniwas Patil - Danve : खासदार श्रीनिवास पाटलांची रेल्वे राज्यमंत्री दानवेंकडे मोठी मागणी; म्हणाले...

गेल्या 70 वर्षात काँग्रेसने केवळ भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटी रूपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रोकड सापडली आहे. हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आजवर देश लुटण्याचेच काम केले आहे, असे टीकास्त्र खासदार धनंजय महाडिक यांनी सोडले. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान आहे, हे लक्षात आल्यामुळेच देशातील जनतेने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार केला आहे, असेही खासदार महाडिक म्हणाले.

सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध आरोग्यविषयक योजना राबवत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सक्षम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

(Edited by- Ganesh Thombare)

Dhananjay Mahadik
Ajit Pawar: अजितदादा, तुम्ही काय दिवे लावलेत ? संतप्त संशोधक विद्यार्थ्यांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com