Rohit Pawar Vs Manikrao Kokate : रोहित पवार म्हणाले, 'माणिकराव कोकाटे यांची नोटीस पाहून हसू आवरले नाही!'

Rohit Pawar Vs Manikrao Kokate : तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आरोपांची राळ उठवली होती. सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंच्या मंत्रालयात बदल करण्यात आला होता.
Rohit Pawar On Manikrao Kokate
Rohit Pawar On Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. ऑनलाईन रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पावसाळी अधिवेशनात व्हायरल झाला होता.

  2. रोहित पवार यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती; मात्र त्यांना क्रीडामंत्रीपद देण्यात आले.

  3. आता कोकाटेंनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली असून त्यावर पवारांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.

Rohit Pawar news : पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडिओ तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी कोकाटे यांच्यावर आरोप झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर कोकाटेंची विकेट पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांच्या मंत्रालयात बदल करण्यात आला आणि त्यांना क्रीडामंत्री करण्यात आले. यानंतर आता व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात क्रीडामंत्री कोकाटे यांनी रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून आता प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशातच रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, 'नोटीस पाहून, असू आवरले नाहीत', असा जबरदस्त टोला लगावला आहे.

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. त्यावर विरोधी पक्ष आणि नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले. या संदर्भात क्रीडा मंत्री कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. आमदार पवार यांनी देखील तेवढ्याच कडक शब्दात कोकाटे यांना सुनावले आहे. आमदार पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

Rohit Pawar On Manikrao Kokate
Rohit Pawar : रोहित पवार संकटातून बाहेर; शिखर बँकेतील कथित घोटाळाप्रकरणी कोर्टाचा मोठा दिलासा

आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणतात, माजी कृषिमंत्र्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीची नोटीस आली आहे. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता. मात्र, वेळ आली नव्हती. एवढे कांड करूनही तुम्ही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केले कशाला? शेतकऱ्यांबाबत असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम वेगळे सांगण्याची गरज नाही.

रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना चांगलाच राजकीय चिमटा घेतला आहे. त्यांनी कोकाटे यांनी पाठविलेली मानहानीची नोटीस देखील 'एक्स' वर पोस्ट केली आहे. ते पुढे म्हणाले, कोकाटे यांची नोटीस मजेशीर आहे. नोटीस पाहून मला हसू आवरले नाही. पण लक्षात ठेवा, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात. हे मी पुराव्यासह प्रूफ केले होते. उद्या देखील पुराव्यासह प्रुफ करीन.

त्यावेळी कृषिमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यावर चहुबाजूने टीका झाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अडचणीत आले होते. मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्यावर कारवाई करावी असा दबाव राजकीय नेत्यांनी केला होता. याचा परिणाम म्हणून माणिकराव कोकाटे यांचे कृषिमंत्री पद गेले होते.

Rohit Pawar On Manikrao Kokate
Manikrao Kokate : गणेशोत्सवात आता राजकारणाला ‘नो एंट्री’, कोकाटेंनी आदेशच तसे दिले..

FAQs :

प्र.१: माणिकराव कोकाटेंचा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला होता?
👉 ऑनलाईन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ पावसाळी अधिवेशनात व्हायरल झाला होता.

प्र.२: कोकाटेंनी मानहानीची नोटीस कोणाला पाठवली आहे?
👉 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना.

प्र.३: रोहित पवारांनी या नोटीसीवर काय प्रतिक्रिया दिली?
👉 त्यांनी "नोटीस पाहून असू आवरले नाहीत" असा उपरोधिक टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com