Rohit Pawar : रोहित पवार संकटातून बाहेर; शिखर बँकेतील कथित घोटाळाप्रकरणी कोर्टाचा मोठा दिलासा

Shikhar Bank Scam : कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पीएमएलए कोर्टानं रोहित पवारांना जामीन मंजूर केला आहे.
Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रोहित पवारांवर पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असतानाही कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे.

  2. ते सरकारविरोधी आक्रमक भूमिकेत असून शिंदे गटाच्या मंत्र्यांवरही गंभीर आरोप केले आहेत.

  3. या कोर्ट निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आनंद तर विरोधकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार महायुतीविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. दरम्यान त्यांच्या अलिकडेच राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणात ईडीने बारामती अ‍ॅग्रोशी संबंधित ₹50 कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली होती. तसेच त्यांना पीएमएलए कोर्टात हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली होती. पण आता त्यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून रोहित पवार यांनी सरकार विरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिवेशन काळात तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळताचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलं होत. त्यानंतर अलीकडेच रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत पाच हजार कोटींचा घोटाळा केल्या दावा केला होता. हा दावा करत मोर्चा देखील काढला. त्यांना अडवण्यासाठी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव अडकवण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.

Rohit Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांच्या हातून आणखी एका मंत्र्याची होणार शिकार? 5,000 कोटींचा घोटाळा, निवडणुकीत पैसा वापरल्याचा खळबळजनक आरोप

या प्रकरणा पीएमएलए कोर्टात देखील त्यांना हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे राज्याचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लावले होते. एकीकडे या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पीएमएलए कोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. त्यांचा कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे रोहित पवारांना सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, या प्रकरणात माझे नाव नव्हते. या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 75 नेत्यांची नावे आहेत. माझ्या वेळी तेथे प्रशासक होते. मी राजकीय बोर्ड ती टेंडरपेक्षा अधिकच्या भावाने फॅक्टरी घेतली होती.

मात्र फक्त सरकारविरोधात बोलत असल्याने माझ्यावर ही कारवाई केली गेली. ईडीकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यात ईडीचे अधिकारी कुठेही चुकलेले नाहीत. सरकार जसे सांगेल तसे ते वागत आहेत. ईडीने केलेले आरोप हे हवेतील असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar
Rohit Pawar Vs Ram Shinde : भावकीचा वाद की 'टॉर्चर'चं राजकारण? राम शिंदेंचं रडण्यामागं 'मोठ्या खुर्चीचा प्लॅन' रोहित पवारांनी सांगितला

FAQs :

प्र.१: रोहित पवारांना कोणत्या प्रकरणात कोर्टाची नोटीस आली होती?
उ: सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना पीएमएलए कोर्टात हजर राहण्याची नोटीस आली होती.

प्र.२: कोर्टाने रोहित पवारांना काय निर्णय दिला?
उ: कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.

प्र.३: रोहित पवारांचा सरकारविरोधी भूमिकेबाबत काय परिणाम होत आहे?
उ: त्यांची भूमिका अधिक आक्रमक होत असून विरोधकांमध्ये अस्वस्थता दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com