Rohit Pawar : कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांनी सभा का नाही घेतली? रोहित पवारांनीच सांगितलं कारण

Rohit Pawar Ajit Pawar Ram Shinde : थोडक्यात बचावलास. मी सभा घेतली असती तर काय झालं असतं कल्पना कर. दर्शन घे काकांच', अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार रोहित पवार यांच्यावर केली.
Ajit Pawar Rohit Pawar
Ajit Pawar Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. त्यावेळी 'थोडक्यात बचावलास. मी सभा घेतली असती तर काय झालं असतं कल्पना कर. दर्शन घे काकांच', अशी मिश्किल टिप्पणी केली. राम शिंदे यांनी माझ्या पराभवाच्या कटात अजित पवार सामिल असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांनी स्वतःच अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये सभा का घेतली नाही? याचे कारण सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले, 'सभा झाली असती तर काही प्रमाणात मतं वर खाली झाली असती. कदाचित उलटा निकाल देखील लागू शकला असता. पण अजित पवार हे बारामतीत अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी ते खूप मोठे नेते आहेत. मतदारसंघात येणं अथवा न येणं हा त्यांचा निर्णय आहे.'

Ajit Pawar Rohit Pawar
Uddhav Thackeray : दारुण पराभवानंतर ठाकरेंनी पुन्हा डरकाळी फोडली; म्हणाले, 'ते फडण'वीस' असले तरी आपण...'

रोहित पवार यांनी अजित पवारांचे आशीर्वाद घेतले त्यावर बोलताना ते म्हणाले संस्कारानुसार मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. जरी आमच्या विचारांमध्ये भिन्नता असली तरी घरातील ज्येष्ठांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे.

राम शिंदे यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांना रोहित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अजितदादांची तक्रार करणं हा रडीचा डाव आहे. 2019 ला त्यांनी विखे पाटीलांवर खापर फोडलं. राम शिंदे यांना मुख्यमंत्री करावं कारण ते फडणवीस आणि अमित शहा यांच्यापेक्षा पेक्षा मोठे झाले आहेत, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांचा निसटता विजय

रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये विजयासाठी मोठी चूरस होती. मात्र, रोहित पवार यांनी 1243 मतांनी विजय मिळवला. राम शिंदे यांना एक लाख 26 हजार 433 मतं मिळाली तर रोहित पवार यांना एक लाख 27 हजार 676 मतं मिळाली.

Ajit Pawar Rohit Pawar
Chinmay Krishna Das Prabhu : बांग्लादेशात हिंदू नेत्याला अटक; देशद्रोहाचा खटला चालणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com