Mahadev Jankar News : 'रासप'नी केला 'या' दोन मतदारसंघावर दावा; अन्यथा 288 जागा लढण्याचा जानकरांचा इशारा

Political News : जागावाटपाची चर्चा सुरु होण्यापूर्वीच महायुतीमधील घटक पक्षाने जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने दोन मतदारसंघावर दावा केला आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभेची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु झालेली नाही. त्यामुळेच येत्या काळात ही जागावाटपाची चर्चा सुरु होण्यापूर्वीच महायुतीमधील घटक पक्षाने जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबईतील दोन मतदारसंघावर दावा केला आहे.

महायुतीच्या जागावाटपात येत्या काळात रासपला सन्मानजनक जागा मिळाव्यात अन्यथा 288 जागा लढण्याचा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे. त्यासोबतच मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या दोन विधानसभा मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकला आहे. मागठाणे विधानसभेत सध्या शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील अडचणी वाढ होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत रासपच्या वाट्याला परभणी लोकसभेची जागा सोडली होती. या ठिकाणी महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना 4 लाख 87 हजार मतदान मिळाले होते.

त्यासोबतच महाराष्ट्रात 4 आमदार निवडून आले. नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत. उत्तरप्रदेश मध्येही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आमची मतांची टक्केवारी वाढतं चालली आहे. चार राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केला आहे.

Mahadev Jankar
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंविरोधात मुस्लिम समाजाची घोषणाबाजी; मातोश्री बाहेर तणावाचे वातावरण

येत्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही फिल्म आघाडी काढत आहोत. काही वर्कर आहेत, त्यांच्यासाठी आज युनियनची घोषणा होत आहे. यामध्ये आमचे ठाकूर आहेत, यादव आहेत. त्यांना मी म्हटलं की पक्षाच्या अंतर्गत युनियन असावी. त्यासाठी आमच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात बैठका सुरु आहेत, असेही महादेव जानकर यांनी सांगितले.

Mahadev Jankar
Pune Congress : अरविंद शिंदेंचे 'सिक्रेट मिशन'! ठाकरेंचा मोहरा लावला गळाला, रमेश बागवेंवर कुरघोडी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com