Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लिम समाज एकत्र आला आहे. मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे नऊ खासदार लोकसभेत पाठवले असतानांही वक्फ बोर्डाच्या निर्णयाला विरोध केला नसल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने शनिवारी सायंकाळी मातोश्री बाहेर आंदोलन केले.
या आंदोलनानंतर मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः मुस्लिम बांधवांचे दोन गट आमने-सामने आले आहेत. एक गट त्यांच्या विरोधात आहे तर दुसरा गट उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनानंतर मातोश्रीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मातोश्रीमधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघत असताना मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने मातोश्री बाहेर जमायला सुरुवात झाली. त्यामुळे मातोश्री बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा मातोश्री बाहेर दाखल झाला होता. त्याचवेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मातोश्री बाहेर रस्ता जाम केला होता. दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे ठाण्यातील सभेसाठी रवाना झाले.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मते दिले आहेत. मात्र, ते वक्फ बोर्ड संदर्भात का बोलत नाहीत, असा आरोप केला जात आहे. त्याचवेळी घोषणाबाजी केली जात असल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.