Rupali Chakankar : खरातला वाचवण्यासाठी रुपाली चाकणकरांची धडपड; 'ते' पत्र आले समोर! खुलासा केला तरी कारवाईचे निर्देश

Rupali Chakankar Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला नोटीस पाठवत त्यावर कारवाई करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी दिले होते. त्या संदर्भातील पत्र आता पुढे आले आहे.
Rupali Chakankar Ashok Kharat Case
Rupali Chakankar Ashok Kharat Case sarkarnama
Published on
Updated on

Chakankar News: अशोक खरात प्रकरण एका स्थानिक दैनिकाने एका वर्षापूर्वीच समोर आणले होते. त्यांनी दिलेल्या बातमीमध्ये थेट अशोक खरातचे नाव नव्हते मात्र कॅप्टनचे कारनामे या मथळ्याखाली दिलेल्या बातमीची दखल त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली होती.

चाकणकरांनी 'खबरदार पुढारी'च्या संपादकाला नोटीस पाठवत या प्रकरणी खुलासा तसेच माफी मागण्यास सांगितले होते. संपादकाने या प्रकरणी खुलासा केल्यानंतरही चाकणकरांनी पुरावे नसताना अशोक खरातांची बदमानी केली, असे सांगत थेट संपादकावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. त्या संदर्भात पत्र त्यांनी पोलिसांना दिले होते. ते पत्र आता समोर आले आहे.

या पत्रात दत्तात्रय खेमनर यांनी सदर बातमी खोटी असल्याचे त्याच वर्तमानपत्रात तसे प्रसिद्ध करावे, यास्तव प्रसिद्धीनंतर महिलांची बदनामी होईल अशी खोटी बातमी देणारे वर्तमानपत्र बंद करण्यात यावे, अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी योग्य ती न्यायोचित कार्यवाही करणेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांना आदेश द्यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा आठ दिवसात देण्याचे निर्देश चाकणकर यांनी दिले होते.

Rupali Chakankar Ashok Kharat Case
Ashok Kharat Case: '...म्हणून अशोक खरातचा 'या' तारखेला एन्काऊंटर होऊ शकतो!' महिला नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

...भानगडी समोर आल्या असता

हे पत्र काँग्रेसने शेअर करत म्हटले आहे की, तेव्हाच दैनिकाने केलेल्या आरोपांची दखल घेऊन या खरातची चौकशी केली गेली असती, तर या सगळ्या भानगडी तेव्हाच समोर आल्या असत्या. आता वेगळ्या मार्गाने व्हिडिओज समोर आल्यावर करण्यात आलेल्या कारवाई मुळे गृहमंत्र्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेऊ नये, ते एवढेच न्यायप्रिय असले असते तर तेव्हाच कारवाई होऊन राज्यातील अनेक महिला भगिनींना अत्याचार सहन करावे लागले नसते.

चाकणकर, मंत्र्यांची चौकशी करा

या प्रकरणात महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांना रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करून कारवाई होणे गरजेचे आहे तसेच या प्रकरणात सामील महायुती व सरकार मधील सर्व मंत्री, नेते, आमदार, अधिकारी, कर्मचारी यांची ही चौकशी व्हावी आणि सत्य राज्यातील जनतेच्या समोर यावे, अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे.

Rupali Chakankar Ashok Kharat Case
Ashok Kharat Properties: कॅप्टन अशोक खरात प्रकरणात सुजय विखेंची उडी; अजून बरेच मोठे मासे एक्सपोज होणार, रोख कुणाकडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com