Saam Exit Poll Video : बालेकिल्ल्यातच 'शेकाप'ला धक्का, 'साम'च्या एक्झिट पोलमध्ये काय?

Saam exit poll mahendra dalvi Chitralekha Patil : लोकसभा निवडणुकीच्या वेळी अलिबाग मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळू शकले नाही. येथून तब्बल 38 हजारांचे लीड महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना होते.
Saam Exit Poll
Saam Exit Pollsarkarnama
Published on
Updated on

Saam Exit Poll : अलिबाग मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात लढत होत होती. मात्र, जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यामध्ये थेट लढत झाली.

'साम'च्या एक्झिट पोलनुसार ही निवडणूक चित्रालेख पाटील यांना जड गेली असून संभाव्य आमदार म्हणून महेंद्र दळवी हे विजयी होण्याची शक्यता आहे. महेंद्र दळवी यांच्या नावाशी साधर्म असलेले आणखी दोन तीन उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या डमी उमेदवारांचा मतविभागणीमध्ये फायदा झाल नसल्याचे सामच्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत.

भाजपचे बंडखोर भोईर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी देखील दळवी यांच्या विजयात अडसर ठरत नसल्याचे 'साम'च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत शेकापमध्ये महाविकास आघाडीला पाठींबा दिला होता. अलिबाग मतदारसंघ हा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अलिबाग मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळू शकले नाही. येथून तब्बल 38 हजारांचे लीड महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com