Eknath Shinde News : मुंबईतील सभा फ्लॉप, ते फॅमिली गॅदरिंग; शिंदेंनी उडवली आघाडीची खिल्ली

Political News : रविवारचा दिवस हा काळा दिवस होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सोडले आहे, अशी टीका या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Eknath Shinde News :
Eknath Shinde News :Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर पार पडलेली सभा ही फ्लॉप झाली असून, ते केवळ फॅमिली गॅदरिंग होते, असा खोचक टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या इंडिया आघाडीच्या सभेतील हवाच काढली.

रविवारचा दिवस हा काळा दिवस होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सोडले आहे. त्यामुळे केवळ मोदी सरकारच्या कारभारावर नैराश्यातून टीका केली जात आहे. विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षातील नेते मोदी नैराश्यातून एकत्र आले होते, अशी टीका या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Eknath Shinde News)

Eknath Shinde News :
Girish Mahajan on Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या उमेदवारीवर महाजनांचे सूचक वक्तव्य; त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषयच...

अडीच वर्षांपूर्वीचं सरकार हे स्पीड ब्रेकर हॊते. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प रखडले. आता ही सर्व कामे आमच्या सरकारने सुरू केली आहेत. त्यामुळे सरकारच्या कामांचा फायदा येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांना हवे ते देण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतीर्थावरून जिथं बाळासाहेब देशाला मार्गदर्शन करायचे, तिथंच यांनी अशी सभा घेऊन लायकी दाखवून दिली आहे. त्यांच्या अलायन्सकडे सध्या पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, धड विरोधी पक्षनेता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीएचा विजय होईल, यात शंका नाही.

'शिवतारे (Vijay Shivatare) मला भेटले त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य आहे... ते सध्या उपचार घेत आहेत. महायुतीमध्ये सगळे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, यात शंका नाही,' असं म्हणत शिवतारे-पवार वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले.

R

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com