Eknath Shinde : फडणवीसांनी 'ते' शब्दच उच्चारले नाही; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Eknath Shinde News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या मोर्चाचा धडाका..
Eknath Shinde : Uddhav Thackeray
Eknath Shinde : Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde On Uddhav Thackeray : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकारावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्तालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यात महाविकास आघाडीनचे नेते सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Eknath Shinde : Uddhav Thackeray
Aditya Thackeray News : गद्दार गँगमधील अधिकाऱ्यांना सांगतो, आमचं सरकार आल्यावर... ; आदित्य ठाकरेंचा कडक इशारा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नुकतंच माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, "त्यांच्या अडिच वर्षाच दोन मंत्री जेल मध्ये गेले. पोलीस कंगना रानावतचं घर तोडलं. केतकी चितळेला जेल मध्ये टाकलं. नवनीत राणा यांना ही जेलमध्ये टाकलं. यांच्या काळात किती गुंडगिरी होती. ते विसरलेत का? अशी आठवण शिंदेंनी व्यक्त केली.

Eknath Shinde : Uddhav Thackeray
Aditya Thackeray : हिंदुत्वाचं नाही हे रावणाचं राज्य, यांना अयोध्याला जाण्याचा अधिकार नाही : आदित्य ठाकरेंनी शिंदेंनी डिवचलं!

"आम्ही पातळी सोडून बोललेलो नाही, कारण ही संस्कृती आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. पण काल जे मी पाहिलं ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आम्ही कमरेचं डोक्यावर गुंडाळणार नाही. पण ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणाले, पण फडणवीसांनी फार संयम राखला. फडणवीस त्यांना उद्धट ठाकरे किंवा उद्ध्वस्त ठाकरे नाही म्हणाले. ही संस्कृती आहे. ही परंपरा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. ठाकरे म्हणाले, "आयुक्त काय सरकारचं घटक म्हणून काम करत आहेत का ? अशी शंका येते. फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लालघोटेपणा करणारा नुसती फडणवीसी करणारा एक माणूस, गृहमंत्री म्हणून मिरवतोय. यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे. ठाण्यातल्या एका पत्रकाराला धमकी देण्यात आली, रोशनीकडून माफीचा व्हिडीओ करण्यात आला. फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहण्याचा काहीच अधिकार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com