आता मलिक नव्हे तर वानखेडे दाम्पत्याने थेट 'यांनाच' खेचले कोर्टात

नवाब मलिक (NAwab Malik) यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात विविध प्रकारचे आरोप केले
Sameer Wankhede, Kranti Redkar
Sameer Wankhede, Kranti Redkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मोर्चा उघडून विविध प्रकारचे आरोप केले आहेत. समीर वानखेडे ((Sameer Wankhede) त्यांची बहिण यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांच्या विरोधात खंडणी वसूल केल्याचा, खोटे जात प्रमाणपत्र सादर करुन फर्जीवाडा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच त्यांनी वानखेडेंचे बर्थ सर्टिफिकेट, त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा, त्यांचे काही कौटुंबिक फोटो प्रसिद्ध केले आहेत.

या सगळ्या विरोधात वानखेडे कुटुंबियांनी यापुर्वीच नवाब मलिक यांना कोर्टात खेचले आहे. त्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhed) आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यावेळी वानखडे यांनी सोशल मिडियावर त्यांच्या आणि कुटुंबियांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर लगाम लावण्याच्या हेतुने सोशल मिडीया कंपन्यांना कोर्टात खेचले आहे. दिंडोशी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. अॅड. रोहन जनार्दन हे वानखेडे यांच्यावतीने खटला लढवत आहेत.

Sameer Wankhede, Kranti Redkar
सीडीएस बिपीन रावत यांचा उत्तराधिकारी कोण? ही नावे चर्चेत

या सोशल मिडियाच्या माध्यमातून वानखेडे कुटुंबियांवर खालच्या पातळीत भाष्य करणाऱ्या किंवा बदनामी करणाऱ्यांच्या पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्मनी थांबवाव्यात आणि त्या काढून टाकाव्यात असे आदेश कोर्टाने द्यावेत, अशी विनंती वानखेडे कुटुंबियांच्या वतीने कोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र न्यायालयाने अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावनी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

Sameer Wankhede, Kranti Redkar
७० वर्षांपूर्वी ४२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत होणार १६२ सदस्य...

मागच्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल थांबवला आहे. मात्र त्यापुर्वी त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातीचे प्रमाणपत्र बाळगल्याचे आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com