Viral Clip Controversy : 'ती' क्लिप व्हायरल झाली तर तानाजीराव फाशी घेतील...; संतोष बांगरांचा भाजप आमदाराबाबत धक्कादायक दावा, सगळी प्रकरणं बाहेर काढली

Sanjay Bangar Vs Tanaji Mutkul : भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्याबाबत शिवसेना आमदार संतोष बांगर यांची धक्कादायक दावा केला आहे. मुटकुळे यांची एक क्लिप आपल्याकडे आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Hinoli Municipal Council Election-MLA Mutkule-Bangar Clash News
Hinoli Municipal Council Election-MLA Mutkule-Bangar Clash NewsSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Bangar News : एकनाथ शिंदेच आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील वादाने टोक गाठले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीवर दोघेजण समोरासमोर आले होते. तेव्हा बांगर यांनी आपल्याकडे आमदारांची क्लिप आली आहे. ती क्लिप बाहेर आली तर त्यांना फाशी घ्यायला लागेल, असा दावा करत आमदार तानाजी मुटकुळेंवर निशाणा साधला.

संतोष बांगर म्हणाले, 'माझं 20 कोटींचे घर नाही. तानाजीराव उभे राहिले तेव्हा त्यांचे कपडेपण सुधीरअप्पांनी घेऊन दिले. आज जर तुम्ही त्यांचा महल बघितला तर ते पैसे काय त्यांनी सोयाबीन विकून आणला का? ते पैसे त्यांनी शेत विकून आणले का? 200 एकरच्यावर त्यांच्याकडे जमीन झाली. गाड्या घोड्या झाल्या, त्या कुठून झाल्या? ते दोन नंबरमधून आले.'

'हिंगोली शहरातील लोकांना विचारा हिंगोलीत काय झालं, गाडीपुऱ्यात काय झालं,गाडीपुऱ्याची क्लिप आमच्याकडे आली आहे. ती एखादी क्लिप व्हायरल झाली तर स्थानिकच्या आमदाराला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. जर क्लिप बाहेर काढली तर तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. ', असा दावा बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यासमोरच वृत्तवाहिनीच्या चर्चेत केला.

Hinoli Municipal Council Election-MLA Mutkule-Bangar Clash News
Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेच्या भाषणात; लाडकी बहीण...! लाडकी बहीण...!

'ज्या कार्यकर्त्याने क्लिप काढली त्या कार्यकर्त्याला 15 ते 20 लाख रुपये देऊन सेटलमेंट केली. सरस्वतीनगरमध्ये मुलासाठी सेटलमेंट केली. अकोल्यामध्ये मोठ्या नेत्याने सेटमेंट करून ड्रायव्हरचा बळी दिला. सुज्ञान जनतेला हे सगळे माहिती आहे.', असे गंभीर आरोप देखील बांगर यांनी मुटकुळे यांच्यावर केला.

आमदार तानाजी मुटकुळेंचे चोख प्रत्युत्तर

तानाजी मुटकुळे यांनी देखील बांगर यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, 'ड्राव्हरच्या संदर्भात संतोष बांगर बोलतात तो ड्रायव्हर माझ्याकडे दोन वर्षापासून नाही. आणि ड्रायव्हरने केलेले कृत्य मालकावर येतात का? चोरी करून राजकारण करात असेल तर चालणार नाही. पैसे वाटल्याशिवाय ते निवडून येत नाही. 100 कोटी वाटून निवडून आले. जमिन लाटण्यासाठी खून केला. तुम्हाला देखील फाशी घ्यावी लागेल.'

Hinoli Municipal Council Election-MLA Mutkule-Bangar Clash News
Mehboob Shaikh Politics: मेहबूब शेख यांनी भाजपला डिवचले; भाजप सत्तेत असताना हिंदू धोक्यात येतोच कसा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com