MVA Political News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे.
ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह हवे तितक्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही तर निकाल अजून वेगळा लागला असतामी, असा दावा करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गेल्या काही दिवसातील भूमिका पहिली तर ठाकरे गटाला विरोधी करणारी राहिली आहे. राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम हा महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या पालख्या वाहण्याचा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे केली.
विशेषतः ही सुपारी गँग लोकसभा निवडणुकीत उतरली नसती तर महाविकास आघाडीच्या 30 ऐवजी 38 जागा निवडून आल्या असत्या. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरेंनी 400 जागा लढाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. मविआच्या तिन्ही पक्षांच्या विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांसह इतर धर्मियांचे मतदान शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला झाल्याने गेल्या काही दिवसापासून मनसेच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) विजयासाठी शिवसेनेने जीवाचं रान केले आहे. त्यामुळे काँग्रेसनं 13 जागा जिंकल्यात त्याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेनेच्या मदतीमुळे काँग्रेसने बाजी मारली.
संविधान बदलाचा नॅरेटिव्ह कधीच खोटा नव्हता, मोहनराव भागवत तेव्हाच का बोलले नाही? आता बोलण्यात काहीही अर्थ नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागांच्या वाटपाची चर्चा आम्ही पक्षाध्यक्षांसोबत करु राहुल गांधीपासून रमेश चेन्नीथला आहेत, असेही राऊत म्हणाले.