Sanjay Raut On Fadnavis : ''माफ करायचं की नाही हे तुम्ही नव्हे तर...''; संजय राऊतांनी फडणवीसांना ठणकावलं

Maharashtra Politics : भाजपने जो गुन्हा केला आहे, तो गुन्हा महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही.
Sanjay Raut and Devendra Fadnavis
Sanjay Raut and Devendra Fadnavissarkarnama

Sanjay Raut News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना आमचा बदला हा आहे की, आम्ही आम्हांला त्रास देणाऱ्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही असं विधान केलं होतं. आता त्यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, आम्हांला माफ करणारे तुम्ही कोण? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तसेच, तुम्हाला माफ करायचे की नाही, हे तुम्ही नव्हे तर आम्ही व महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहोत असंही राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Dipali Sayyed News: ''अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगलं बोलतात,मात्र...''; दीपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट

राऊत पुढे म्हणाले, भाजपने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा प्रमुख पक्ष फोडला आहे. मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या पक्षाचेच अस्तित्त्व संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. यासाठी तपास यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर केला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर आघात केला आहे. त्यामुळे त्यांना माफ करायचे की नाही हे आम्ही ठरवणार आहोत असंही खासदार संजय राऊतांनी( Sanjay Raut) फडणवीसांना ठणकावलं आहे.

भाजपने जो गुन्हा केला आहे, तो गुन्हा महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. जनता भाजपला कधीही माफ करणार नाही. राज्यातील जनता ही वेदना कधीही विसरू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस वारंवार याला माफ केले, त्याला माफ केले म्हणत आहे. देवेंद्र फडणवीस काय माफीचे वाटप करायला बसले आहेत काय? असा सवालही राऊतही यांनी यावेळी उपस्थित केला.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Nagaland Politics: पवारांनंतर आता नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा; कारवाई होणार?

राष्ट्रवादी आपली भूमिका लोकापर्यंत पोहोचवण्यात कमी पडतंय..

संजय राऊत यांनी नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपनं यांनी सत्तास्थापन केल्यावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांसमोर आपली भूमिका पोहोचवण्यात कमी पडत असावा. कारण त्यांनी नागालँडमध्ये भाजपसोबत युती केलेली नाही तर केवळ मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. नागालँड हे सीमेवरील राज्य असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. यात काहीही चुकीचं नाही असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

...म्हणून भाजपची मैत्री कधीच स्वीकारणार नाही!

बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष भाजपने फोडला आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे. त्यामुळे भाजपशी मैत्री शक्य नाही. आज अनेक पक्षांमध्ये शिवसेनेने निर्माण केलेले नेते काम करत आहेत. शिवसेना नसती, बाळासाहेब ठाकरे नसते तर हे नेते कुठेच नसते. त्यामुळे आम्ही भाजपची मैत्री कधीच स्वीकारणार नाही अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com