
Sanjay Raut News : पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर पत्रकरांनी पहलगाम हल्लाच्याबाबत शरद पवार हे सरकारसोबत आहेत. त्यांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे, असा प्रश्न राऊत यांना केला. त्यावर राऊतांनी आर आर पाटील आणि विलासराव देशमुखांच्या राजीनाम्याची आठवण करून दिली.
संजय राऊत म्हणाले,'बाॅम्बस्फोटानंतर शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता. आर आर पाटलांचा राजीनामा घेतला होता ना. मग आर आर पाटलांचा राजीनामा पवारसाहेबांना का घेतला होता? 26/11 च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून शरद पवारासाहेबांना राजीनामा घेतला होता. काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला. गरज नसताना त्यांनी अमित शाहांचे समर्थन करू नये.'
'सरकारबरोबर आहात म्हणजे सरकारच्या चुकांच्या बरोबर आहात का? सरकारने देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात ज्या चुका केल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवारसाहेब होते मंत्रिमंडळात. शिवराज पाटलांची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा घेतला.'असे देखील राऊत म्हणाले.
'आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा. सरकार या गोष्टींचे राजकारण करत आहे. 24 तासात पंतप्रधान बिहारला गेले याचे समर्थन करणार का? याचे समर्थन माननीय शरद पवारसाहेब करणार का?', असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला.
'शहा म्हणतात चुन-चुनकर मारेंगे. मुळात जे घडलंय त्याला जबाबदार गृहमंत्री आहे. अमित शाह राजीनामा देत नसतील तर पंतप्रधानांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करतंय करा पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. कसलं समर्थन करताय चुकांचं सरकारबरोबर आहात म्हणजे सरकारच्या चुकांच्या बरोबर आहात का?' असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी 24 तासात बिहारला जातात. काल मुंबईला 8-9 तास नट नट्यांमध्ये होते. दिल्लीत बसा स्ट्रेटेजी आखा.सगळी जबाबादरी लष्करावर टाकली तुम लडो हम कपडे संभालते है. राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे? सरकारचे समर्थन म्हणजे कमजोरीचे समर्थन. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक लेकर दिसत नाही, असे देखील राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.