Vinod Tawde : ठाकरेंवर संतापले अन् कॅबिनेटच्या निर्णयाने सुखावले! विनोद तावडेंना झाली वाजपेयींसह मुंडेंची आठवण

Uddav Thackeray Atal Bihari Vajpayee Gopinath Munde Cabinet Decisions : विनोद तावडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत उध्दव ठाकरेंवर टीका केली असून टोलमुक्तीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : दसरा मेळाव्यातील उध्दव ठाकरे यांच्या भाषणावरून भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे चांगलेच संतापले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतून त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला आहे. तर दुसरीकडे आज तावडेंना राज्य मंत्रिमंडलाच्या निर्णयानंतर गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण झाली.

विनोद तावडे यांनी एक्सवर उध्दव ठाकरे यांच्या भाषणाची एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यामध्ये ठाकरे म्हणत आहेत की, गाय ही राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती? कारण राज्यमाता गाय आहे. मग गायीचा हंबरडा ही आपली राज्यभाषा होणार का?

Vinod Tawde
Raj Thackeray Vs Eknath Shinde : नक्की कुणामुळे टोलमाफी? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मी आंदोलन केलं, कोर्टात गेलो...

ठाकरेंचा या विधानाचा तावडेंनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा देत प्रशंसनीय काम केले. पण, सनातनविरोधी उध्दव ठाकरे यांना हे पटलेले नाही. हे पाहून मला अटलबिहारी वाजपेयी यांची कवितेच्या ओळी आठवतात.

‘हिन्दू कहने में शर्माते, दूध लजाते, लाज न आती, घोर पतन है, अपनी माँ को, माँ कहने में फटती छाती।‘ या कवितेच्या माध्यमातून विनोद तावडे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे तावडेंनी स्वागत केले आणि त्याचवेळी त्यांना मुंडेंचीही आठवण झाली.

Vinod Tawde
Eknath Shinde : दोन वर्षे पूर्ण केली, हे कर्तृत्व कसे? प्रचारकी मु्द्द्यांवरच शिंदे यांचा जोर

गोपीनाथ मुंडेंची आठवण

टोलमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना तावडे यांनी म्हटले आहे की, मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचन दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी दिले होते. त्याची आज पूर्तता होते आहे याचा आनंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com