Anjali Damania Video : धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांचा व्हिडिओ अंजली दमानियांनी आणला समोर; पोलिसांना विचारला जळजळीत प्रश्न

Anjali Damania Dhananjay Munde Valmik Karad : अंजली दमानिया यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असल्याचे दिसत आहेत. दमानिया यांनी 'हे असले बॉस ?' असा प्रश्न विचारला आहे.
Valmik Karad-Dhananjay Munde
Valmik Karad-Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Anjalia Damania News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून त्या सातत्याने मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीका करत आहेत. आपल्या एक्स अकाऊंटवरू (ट्विटर) धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच गाडीतून जात असलेला व्हिडिओ दमानिया यांनी शेअर करत पोलिसांना जळजळीत प्रश्न विचारला आहे.

अंजलिया दमानिया यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा रिल्सचा असल्याचा दिसते आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हे गाडीत बसलेले आहेत. गाडीतू ते पोलिसांना काहीतरी सूचना करत आहेत तर गाडीच्या बाहेर उभे असलेले पोलिस त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहे.

हा व्हिडिओ कधीचा आहे हे दमानिया यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, या व्हिडिओसोबत त्यांनी 'हे पोलिस आहेत का या वाल्मिक कराडांचे नोकर?' असा जळजळीत प्रश्न विचारला आहे. तसेच एसपी नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलिस ऑफिसरने या पुढे जिहुजुरी करता कामा नये, असे आपल्या दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे असले बॉस ?

अंजली दमानिया यांनी केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमधील व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असल्याचे दिसत आहेत. दमानिया यांनी 'हे असले बॉस ?' असा प्रश्न विचारत ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणी केली आहे.

मुंडे-कराड एकाच गाडीत

दमानिया यांच्या ट्विटमधील आणखी एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवत असून त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेले दिसत आहे. ट्विटमध्ये इन्स्टाग्रामवर अशी रिल्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल व्हिजन असणार आहे का ? असा प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे.

Valmik Karad-Dhananjay Munde
Raosaheb Danve Vs Sanjay Raut : '...ते आमच्या पक्षाचे आहेत का?' राऊतांवर भडकलेले दानवे म्हणाले, ''ते' ठाकरे पिता-पुत्रांमध्ये देखील भांडण लावतील'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com