
Delhi News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांनतर यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला 24 दिवस पूर्ण झाले असले तरी या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून त्या आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या कोठडीत करण्यात आली. त्यातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरण दिल्ली दरबारी पोहचले असून खासदार बजरंग सोनवणेंनी या प्रकरणातील दोन पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून (CID) सुरु असताना बुधवारी या प्रकरणी राज्य सरकरकडून एसआयटीही स्थापन करण्यात आली. सीआयडी अधिकाऱ्यांची संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी भेट घेतली. सीआयडीकडून सध्या युद्धपातळीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे
या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता हे प्रकरण दिल्लीत सुद्धा पोहोचले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आगोयाची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी केली आहे.
या बाबत प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, मानवाधिकार आयोगाला आम्ही तक्रार दिली आहे. संतोष देशमुख प्रकरणी तपास होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सोनावणे यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता ते दोन पोलिस अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आयोगाने दखल घेतली की सर्व चौकशी होईल, असे ते म्हणाले.
देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी 43 लाख रुपयांची मदत जमा
दरम्यान, सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या मदत फेरीतून तब्बल 43 लाख रुपये जमा झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांनी पुढाकार घेत माजलगाव तालुक्यातून जमा झालेला निधी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. 9 डिसेंबरला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्यानंतर देशमुख कुटुंब यांना आधार मिळावा यासाठी माजलगाव शहरात मदत फेरी काढून व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांनी मदतीचा हात दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.