Santosh Deshmukh Murder Case : ‘SIT’ने सर्व डिजीटल पुराव्यांची केली फॉरेन्सिककडून पडताळणी करून केस केली अधिक पक्की!

SIT investigation : विशेष तपास पथकाने ८० दिवसांत तपास करुन दोषारोपत्र न्यायालयात सादर केले आहे. या तपासातून अनेक खुलासे होत आहेत.
SIT and Santosh Deshmukh
SIT and Santosh Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

SIT investigation in Santosh Deshmukh murder case : बीडमधील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. याला कारण होते अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील पवनचक्ककी प्रकल्पावरील भांडण आणि तत्पुर्वी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरुन कंपनीला धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतली होती. खंडणीसाठीच सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांनी भांडण केले आणि तिथे संतोष देशमुख गेल्याने खंडणीचा उद्देश सफल होणार नाही म्हणूनच त्यांची हत्या झाली.

पवनक्कीच्या खंडणीआड आल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाली असून याचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड असल्याचे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आले. न्यायालयात ही केस पक्की करण्याच्या दृष्टीने एसआयटीने पुरावेही तेवढेच पक्के केले आहेत.

SIT and Santosh Deshmukh
Nagpur political News : विधानपरिषदेवर नागपूरमधून कोण जाणार? कोहळे, जोशी, ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा

 संतोष देशमुखांना मारहाण करतानाच्या व्हिडीओचे फोटो तयार करुन या फोटोतील व्यक्ती हेच अटक केलेले व्यक्ती असल्याची पुष्टी फॉरेन्सिककडून करुन घेतली आहे. आरोपींच्या आवाजांच्या नमुन्यांचीही फॉरेन्सिककडून पडताळणी करण्यात आली आहे.

खुन, खंडणी व अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने ८० दिवसांत तपास करुन दोषारोपत्र न्यायालयात सादर केले आहे. या तपासातून अनेक खुलासे होत आहेत. पोलिसांनी(Police) आरोपींच्या अटकेनंतर पोलिस कोठडीतून या गुन्ह्यांचा तपास करताना न्यायालयातही केस सक्षम ठरावी, या दृष्टीने पुराव्यांची जंत्री जमवली आहे. विविध जबाब, कागदोपत्री पुराव्यांसह डिजीटल पुरावे यात महत्वाचे ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

SIT and Santosh Deshmukh
CM Siddaramaiah Vs DK Shivakumar : डीके शिवकुमार यांचा 'GAME'; सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवू शकणार का?

मारहाणीचे व्हिडिओ अन् फोटो -

संतोष देशमुख(Santosh Deshmukh) यांचे अपहरण करुन त्यांचा निर्घुण खुन करण्यात आला. यावेळी आरोपींनी काही घृणास्पद कृत्यही केले. या कृत्यावेळीही जयराम चाटे, प्रतिक घुले व सुदर्शन घुलेने सेल्फीही घेतले. छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून पुन्हा घृणास्पदकृत करुन शेजारी उभा राहून फोटेा घेतला. शर्ट ओढून काढून फिरवतानाचे व्हिडीओ काढले. देशमुख मोठ्याने ओरडत असताना महेश केदार याने व्हिडीओ घेत सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं यासाठी जबरदस्ती करत होता. यावेळी एक व्हिडीओ तयार करण्यात आला. हा पुरावा देखील यात महत्वाचा ठरला आहे. यावेळी व्हाट्सअप कॉलचा व्हिडिओ देखील करण्यात आला. कृष्णा आंधळेने त्याच्या मोकारपंती ग्रुपवर केलेला हा व्हिडीओ कॉल पाच ते सहा जणांनी पाहीला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com