Nagpur political News : विधानपरिषदेवर नागपूरमधून कोण जाणार? कोहळे, जोशी, ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा

Legislative Council Nagpur seat : ...हे बघता उमेदवार निश्चित करताना संघाचीही मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे बोलले जाते.
vidhanparishad Election
vidhanparishad Election Sarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parishad elections : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागासांठी निवडणूक जाहीर झाली आहे. रिक्त झालेल्या जागांपैकी नागपूरचे प्रवीण दटके यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता कुठल्या नागपूरकराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रवीण दटके मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. सध्या विधानसभेत भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होणार आहे. दक्षिण नागपूरचे माजी आमदार आणि भाजपचे(BJP) जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे आणि माजी जिल्हा प्रमुख डॉ. राजू पोतदार यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

vidhanparishad Election
DK Shivakumar CM Karnataka : ‘’ हवं तर रक्ताने लिहून देतो, डिसेंबरपर्यंत शिवकुमार मुख्यमंत्री बनणार’’ ; काँग्रेस आमदाराचा दावा!

सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपूरचे आमदार होते. मात्र त्यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून वेळेवर उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे(Congress) विकास ठाकरे यांच्याकडून ते पराभूत झाले. संदीप जोशी यांना नागपूर विभागातीय पदवीधर मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. दयाशंकर तिवारी यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून दावेदारी केली होती. त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली होती. तत्पूर्वी त्यांना एकदा भाजपने मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून संधी दिली होती.

माजी जिल्हाध्यक्ष राजू पोतदार हे सावनेर विधानसभा मतादरसंघातून सुनील केदार यांच्या विरोधात लढले आहेत. मात्र त्यांना अपयश आले. यावेळी सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी केदारांचा पराभव केला. अविनाश ठाकरे हे काटोल विधानसभा मतदारसंघातून लढण्याच इच्छुक होते. तत्पूर्वी त्यांना विस्तारक म्हणून भाजपने येथे नेमण्यात आले होते. मात्र बाहेरचा म्हणून भाजपच्या अनेका इच्छुकांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यांना अद्याप विधानसभेची एकदाही संधी पक्षाने दिली नाही.

vidhanparishad Election
Goa politics news : ''गोव्यात हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला नाही'' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकरांनी का केलं असं विधान?

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांचे वास्तव्य आहे. टीम देवेंद्रमध्ये ठाकरे आणि जोशी यांचा समावेश आहे. महायुतीच्या विजयात संघाचे मोठे योगदान लाभले हे सर्वांनीच मान्य केले आहे. हे बघता उमेदवार निश्चित करताना संघाचीही मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे बोलले जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com