Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जात होता', आमदाराच्या दाव्याने खळबळ

Uttam Jankar Alleges Valmik Karad Took 1 Crore Every Day :खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड हा रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा, असा दावा करण्यात आला आहे.
Walmik Karad .jpg
Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या पत्नीची दुसऱ्यांदा तर राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याचीही चौकशी सीआयडीकडून करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेत गंभीर आरोप केला आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड हा रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा. जर एक कोटी रुपयांमध्ये एक हजार रुपये जरी कमी असतील तरी तो अस्वस्थ व्हायचा. एक कोटी रुपये घेतल्याशिवाय हा वाल्मिक झोपत नव्हता, असे जानकर यांनी म्हटले आहे.

एक कोटीमध्ये एक हजार रुपये जरी कमी असतील तर तो कुणाचा खून करा, हातपाय मोडा पण पैसे घेऊन या, असा सांगयचा. एकदा एक कोटीमध्ये एक लाख रुपये कमी होते तर त्याला झोप लागली नाही, हे बीडचे लोक सांगतात असे देखील उत्तम जानकर म्हणाले.

Walmik Karad .jpg
Pune Rajgurunagar Crime : आढळरावांच्या 'त्या' प्रकारावर खासदार गायकवाड भडकल्या; म्हणाल्या, 'हे अत्यंत लाजिरवाणं...'

पंकजा मुंडे यांनी तेव्हाच सांगितले होते यांनी मंत्रिपद कोणाला तरी चालवला दिले आहे. धनंजय मुंडे त्याचा कर्ताकरविता आहे. आणि या सगळ्याच्या प्रकरणामागे ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाचा गुन्हेगार आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या खंडणी, मारामारी, खून शक्य नाही. हा प्रकार एका दिवसात घडला नाही. राजकीय वरदहस्ता असल्याशिवाय हे घडू शकत नाही, असे देखील जानकर म्हणाले.

भयानक गुंडाराज आहे. चौकात वाढदिवस साजरा करताना अथवा नवीन टीपर घेतला तरी हवेत गोळीबार केला जातो. तिथले लोक सांगतात असे 32 खून झाले आहेत. हे खून वाल्मिक कराड हे ज्याच्यासाठी मलिदा गोळा करत होता त्याच्यासाठी झाले होते. जर वाल्मिक कराडला तत्काळ अटक केली नाही तर जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे निघतील, असे देखील जानकर यांनी सांगितले.

Walmik Karad .jpg
Congress on Amit Shah : अमित शहांचा माफीनामा आणि राजीनाम्यासाठी काँग्रेसकडून वर्षभराचं प्लॅनिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com