Dattatray Bharne : वाल्मिक कराडमुळे अडचण, धनंजय मुंडेंच्या मदतीला राष्ट्रवादीचे मंत्री धावले!

Dattatray Bharne Support Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनामाची मागणी विरोधकांनी केली असताना मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dattatray Bharne News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. वाल्मिक कराड यांचे बाॅस, मित्र धनंजय मुंडेंचं आहेत ते मंत्रिमंडळात असताना कराड यांच्यावर योग्य कारवाई होणार नसल्याचे सूर बीडमधील मराठा मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी आवळला होता. वाल्मिक कराड यांनी सरेंडर केले असले तरी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मुंडेंच्या मदतीसाठी धावले आहेत.

क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंयज मुंडेंची पाठराखन केली. नेत्याचे मित्र, कार्यकर्ते असतात. मित्राने काय केले म्हणून वरच्या नेत्याचा असतो असे नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे दत्तात्रेय भरणे म्हणाले.

Dhananjay Munde
Walmik Karad : अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरातच त्यानंतर थेट..., 22 दिवसांपासून कुठे होता गायब? धक्कादायक माहिती आली समोर

तपास सुरू आहे. वाल्मिकजी कराड हे शरण आले आहेत. जे दोषी असतो त्यावर 100 टक्के कारवाई केली जाईल. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत, असे देखील भरणे म्हणाले.

मुश्रीफही मुंडेंच्या मदतीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील धनंजय मुंडेंच्या मागे उभे राहिले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनामाची मागणी विरोधकांनी केली असताना मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. जो पर्यंत कोणी दोषी अडथळ नाही तोपर्यंत कोणी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे देखील मुश्रीफ यांनी सांगितले होते.

Dhananjay Munde
Nagpur ZP News : भाजपनं विधानसभेचं मैदान मारलं, आता तयारी ZP ची; केदार, देशमुखांचं वर्चस्व संपुष्टात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com