
पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी पुणे महानगरपालिके तर्फे एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये 'थोर' इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे. असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.
प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर दाखल गुन्हा आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.गांधी यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी ऑनलाइन नाहीतर प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी,असे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते यांचे वकील मनोज पिंगळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक असे ध़डाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच धारेवर धरताना मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ करण्याचा इशाराच दिल्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी त्यांनी चार ते पाच दिवस झाले पोलिस दल इतक सक्षम असताना तो आरोपी कसा काय सापडत नाही. काल साधारण सहा ते सात तास फॉरेन्सिक टीमने माझ्या मोबाईलमधील जे आवश्यक पुरावे पाहिजे आहेत ते घेतले असल्याची माहिती दिली.तसेच मला कारवाईबाबत कुठल्याही अपडेट पोलिसांकडून मिळत नाहीत. माध्यमांमधून जे अपडेट मिळतात तितकंच मला माहिती असंही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. याचदरम्यान, त्यांनी पोलिसांनी मला सुरक्षा घेण्याबाबत सांगितलं होतं. मात्र, आपण ती नाकारल्याचेही स्पष्ट केलं आहे.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंताना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. आधीच सावंतांना धमकी दिल्याच्या घटनेतील मुख्य संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याच्यावरुन गदारोळ सुरु आहे.अशातच त्यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यातच आता सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे हेे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. पण त्यांच्या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
महायुती सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे,माणिकाराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. काँग्रेसचा एक पूर्वीचा काळ असा होता की, मुख्यमंत्र्यांचेही राजीनामे झालेले आहेत.लाल बहादूर शास्त्रींनी देखील एका रेल्वे अपघातानंतर राजीनाम्याबाबत विचार झालेला आहे.हा एक नीतिमत्तेचा विषय आहे, तो पाळला पाहिजे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारकेड शहराला मुळशी धरणातून पाणी देण्याची मागणी केली. शहराला 5 TMC पाणी मुळशी धरणातून देण्याची आमदारांची मागणी केली. आपल्या मागणीचे पत्र आमदारांनी अजित पवारांकडे दिले.
वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने मुख्य सुत्रधार म्हटले आहे. सीआयडीने न्यायालयात साजर केलेल्या दोषारोपत्रात वाल्मिक कराड याचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख केला आहे. दरम्यान, कराड याला आरोपी ठरवल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, असा जाहीर इशारा देखील दिला आहे.
भाजपचे आमदार बबन लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे. एका वृत्तवाहिनीश बोलताना ते म्हणाले,माझे वय 60 पेक्षा अधिक आहे. मी आता विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र साधुसंताच्या आशीर्वादानं आणि पक्षाने जर संधी दिली तर एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी याआधी हस्तक्षेप अर्ज दाखल होता. यानंतर शरद शिंदे यांनी देखील हस्तक्षेप अर्ज दाखल केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या प्रकरणी दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले. न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
भाजपचे माजी मंत्री तथा परतूरचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली यापुढे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे विधान केले आहे. परंतु साधू संतांचे आशिर्वाद आणि वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर आपल्या लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. आपण आता साठ वर्षांचे झालो असल्याने रिटायरमेंटच्या मार्गावर असल्याचे लोणीकर यांनी आपल्या वाढदिवशीच स्पष्ट केले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रात वाल्मीक कराड हाच मुख्यसूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्या संतापल्या. मी दोषारोपपत्र वाचलेले नाही, तुमच्यावर कोर्ट आॅफ कन्टेट दाखल होईल. मी पुण्यात आहे, पुण्याचे प्रश्न विचारा, इथे त्या तरूणीवर अत्याचार झाले तो प्रश्न का विचारत नाही? असा सवाल पकंजा मुंडे यांनी यावेळी केला.
हे संघटीत गुन्हेगारीचं जाळं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. आज ते सिद्ध झालंय. कागदोपत्री पुराव्याने घडलेल्या घटना, व्हिडीओ, ऑडिओ कॉल आणि सीसीटीव्ही फुटेज सर्व पुरावे मिळाले आहेत. त्यात हे नाव आलं आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मदत करणं, पैसा पुरवणं आणि अशा टोळ्या निर्माण करून त्यांना अभय देऊन अशी कृत्य करून घ्यायची असा उद्योग वाल्मिक कराडचा चलला होता. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड, मुख्य सूत्रधार, आका सगळं काही आहे. हाच सगळं काही करत होता. यानीच बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली.
अवादा कंपनीने ज्यावेळी या हैवानच्या विरोधात तक्रार केली होती. त्याचवेळी याच्यावर कारवाई झाली असती तर आज वैभवीचे वडील जिवंत असते. मात्र, तसं झालं नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली, त्यावरून यामागे कोणीतरी मोठी व्यक्ती आहे, त्याशिवाय एवढी हिमंत होऊच शकत नाही, असा दावाही सुळे यांनी वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख खूनचा सुत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर केला.
जर कोणी म्हणेल की यात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता, तर ते मी कधीही माणूच शकतं नाही. वाल्मिक कराड आज मोठं होण्या मागचं कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहे. त्याच्या शिवाय दुसरा तिसरा कोणीही नाहीये, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख खून प्रकरणात मुंडे यांचा सहभाग असल्याचा दावा पुन्हा एकदा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी मागणी केली आहे. आरोपीला पळून जाण्यासाठी साथ देणाऱ्यांना सह आरोपी केले पाहिजे. आज या घटनेतील मास्टरमाइंड समोर आला आहे. त्याला कोण रसद पुरवत होता, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड आहे. तर दोन नंबर विष्णू चाटे, तीन नंबर आरोपी सुदर्शन घुले आहे. चार नंबरचा प्रतीक घुले, पाच नंबरला सुधीर सांगळे, सहा नंबरला महेश केदार, सात नंबरचा आरोपी जयराम चाटे, तर आठ नंबरचा फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात अनेक खळबळजनक दावे समोर आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या ही एकच साखळी आहे. या साखळीचाच उलगडा दोषारोपपत्रात सीआयडीने केला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबतचा आहे. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा इथं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची भेट झाली होती. यात विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा हा संदेश होता, असे पोलिसांनी दोषारोपपत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारने राज्याच्या विकासासाठी 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा नियोजन केले आहे. यावर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीने शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्याचे ठरवलं आहे. भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
नाशिकमध्ये ‘अ’मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी धडक कारवाई करत छापा टाकला. तरुण मुला-मुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिले जात असल्याचा दावा आहे. छाप्यात कॅफेमध्ये अनेक मुलं- मुली अश्लील चाळे करताना सापडली आहेत. या सर्व मुला- मुलींना पोलिसांनी तब्यात घेतलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे, असा दावा दोषारोपपत्रात केला गेला आहे. खंडणी, अॅट्रोसिटी, हत्याप्रकरणाचे एकत्रित गुन्हे आहेत. पाच साक्षीदारांच्या गोपनीय जबाबानंतर वाल्मिक कराडविरुद्ध पुरावे मिळाले. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीकडे आहेत. विष्णू चाटे दोन नंबरचा आरोपी आहे.
कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो, मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटील आणि आमदार अशोक माने यांनी शक्तीपीठ संघर्ष समितीला पत्र देवून विरोध दर्शविला आहे.
पुण्यातील स्वारगेट स्टँडवर बसस्थानकात तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारला जातोय. अशातच पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे बसवण्यात आलेल्या 5 सीसीटीव्ही पैकी अडीच हजार बंद असल्याचे समोर आले आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जातेय असा आरोप देशमुख कुटुंबाची केला आहे. याबाबत देशमुख कुटुंबानी कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. तर 22 फेब्रुवारी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहाने डिलीट केल्याचाही आरोप देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे.
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची निवड झाली असून विधानसभेत काँग्रेसच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून नेमणुका जाहीर झाल्या आहेत.
स्वारगेट घटनेनंतर एसटी प्रशासनाला जाग आली असून आता एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांप्रमाणे गणवेशसक्ती करण्यात आली आहे. चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करणे बंधणकारक करण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता खाकी टी-शर्टही घालता येणार नाही
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पिंपरी चिंचवडचा जिल्हा म्हणून उल्लेख केला. ही चूक थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समोरचं केल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. तर आरोग्य मंत्र्यांनी पिंपरी चिंचवडचा जिल्हा म्हणून उल्लेख करताना, पिंपरी चिंचवडचे जिल्हाधिकारी असा उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातयं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भगवा फडकवणार अशी घोषणा केली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. दरम्याम याच घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा रक्षक केबिनची तोडफोड केली होती. त्यावरून आता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरे यांना चांगलंच सुनावलं आहे.
विशाळगडावरील अतिक्रमणे वन खात्याने तातडीने जमीनदोस्त करावीत असे आदेशच वन मंत्री नाईक यांनी दिले आहेत. तसेच वन मंत्री नाईक यांनी, विशाळगडावरील वन खात्याच्या जमिनीवर असणारी अतिक्रमणे काढून, ती निघालीच पाहिजेत, गडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणे विरोधात नितीन शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
कोरेगाव तालुक्यातील आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचसह संपूर्ण ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच अख्खे गावच भगवेमय झाले असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. शासनाच्या सदनिका लटल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी अर्ज केला आहे. मात्र याआधीच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य यांनाच विरोधी पक्षनेते करावे असं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे. मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चे दरम्यान काही आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असं ठाकरेंच्या काही नेत्यांचं मत आहे.
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 11 वाजेपर्यंत असा तब्बल 13 तासांचा हा मोठा ब्लॉक असणार आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं. अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे. कोकाटेंना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.