
पुण्यात आता मेट्रोचं जाळ चांगलंच विस्तारलं जात आहे.वाहतुक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी व पुणेकरांचा रोजचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता मोठी अपडेट आली आहे. कारण महापालिकेनं हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. यामुळे शहरी भागासह लोणी काळभोर आणि सासवड या ग्रामीण भागातही मेट्रोचा सेवा मिळणार आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळापंर्यत मेट्रो धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात महायुतीत पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे.राज्य सरकारकडून मंगळवारी(ता.18)आताही नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्यामध्ये कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.देशमुख यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालय सचिव पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपा परंपरेस जागले.वापरा आणि फेका .वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले? अशा शब्दांत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. या खान नावाच्या माणसाला तोंड उघडायचं असेल तर पोलीस आपलं काम निश्चितच करतील, पण त्याच्यात काय उरलंसुरलं असेल तर त्याला आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आहेतच, असे नीतेश राणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. यातच आता मोठा निर्णय आला असून ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारच्या निर्देशानंतर मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणातील गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे.
दापोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पाच नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. विलास शिगवण, मेहबूब तळघरकर, अन्वर रखांगे, संतोष कलगुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं आहे.
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर जोरदार सुरू असून ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. भाजपमध्येदेखील सध्या इन्कमिंग सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील गळती सुरू झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असणारे अभिजीत पवार, हेमंत वाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी ठाण्यातील पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश होणार आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात नेमण्यात आलेल्या नेमण्यात करण्याची मागणी केली आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी विविध मागण्यांसाठी आज उपोषण केले होते. ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील आणि कुस्तीगीर महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे यांच्या विनंतीनंतर मागे घेण्यात आले आहे. रोहित पाटील यांच्या हस्ते सरबत पिऊन पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपले उपोषण सोडले.
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं आणि ज्युनिअर वकीलांना भत्ता मिळावा अशा प्रमुख मागणीसाठी हजारो वकील रस्त्यावर उतरले आहेत. वकिलांनी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी करत सांगलीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह कुंभमेळ्याला जाणार आहेत. ते येथे स्नान करणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी, त्यांची आणि त्यांच्या 40 आमदारांचं पाप कुंभमेळ्यातही धुतलं जाणार नाही, अशी टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना एक साबण द्यावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
राज्यात एकीकडे फोडाफोडीचे वातावरण पाहायला मिळत असतानाच एका व्यासपीठावर दोन विरूद्ध पक्षाचे नेते आल्यास पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळाचे अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) एकाच मंचावर आल्याने देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. दरम्यान वैभव नाईक हे देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यावरून आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी डिवचले आहे. त्यांनी, स्पर्धेच्या स्टेजवर कुणाला बोलवायचे हा आयोजकांचा प्रश्न आहे. हा काही बारामती ऍग्रो चा कार्यक्रम नाही, असा टोला गलावला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सहावा राज्य वेतन आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी ३४६ नवीन पद निर्मिती व खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षाला मोठे धक्के बसत आहे. त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. आज सेनाभवनात पक्षातील नेत्यांची बैठक घेतली जाणार आहे. ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
संभाजी महाराजांविषयी विकीपीडियावर आक्षेपार्ह लेखन करण्यात आले आहे. त्याचे समर्थन कमाल खान याने केले आहे. त्यावरून संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने हा मजकूर हटवण्यासाठी पावले उचलले आहेत. हा मजकूर हटवण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी सायबर विभागाला दिले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. हत्या प्रकरणाचा सगळा घटनाक्रम धनंजय देशमुख यांनी सुळे यांना सांगितला सुप्रिया सुळे यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये, असे सुळे यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यावर धनंजय देशमुख म्हणाले, " गावकरी जी भुमिका घेतील त्यात आम्हीही सहभागी असणार,"
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी उपोषणावर ठाम आहेत. आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ज्ञानेश्वरी मुंडे. मला सुप्रिया सुळेंनी सांगितलं तरी मी उपोषणा करणारचं
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्याच वेळी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सरकारविरुद्ध तीव्र निषेध केला.
आजच्या मंत्रिमंडळ बैठक होणार असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यातच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला गैरहजर आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपींचा सर्व सीडीआर काढले पाहिजे. वाल्मिक कराडची चौकशी ईडी का करीत नाहीत, असा सवाल सुळे यांनी केले. "ही तुमची लढाई नसून ही आमची लढाई आहे," असं सांगत मुख्यमंत्र्यांसमोर आता पदर पसरून न्याय देण्याची मागणी करणार असल्याचंही सुप्रिया म्हणाल्या.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सध्या मस्साजोगला पोहोचल्या असून त्यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोपी सापडत नाही यावर आपला विश्वास बसत नाही. शिवाय आमचे फोन टॅपिंग होतात मग आरोपी कसा सापडत नाही? असा सवाल उपस्थित केला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याज मस्साजोगला जाणार आहेत. यावेळ्या त्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "ग्राऊंड लेव्हलला सुरू असलेली दहशत, अपहरण खंडणी, खून हे कशामुळे आणि कोणामुळे चालू होतं याबाबत आम्ही चर्चा करणार आहे. गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असतो. गावकरी जो निर्णय घेतील त्यावरून पुढील दिशा ठरते."
तुळजापूर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं आहे. अडीच वर्षांपासून तुळजापुरात ड्रग्ज तस्करी होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांसह पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी देशभरातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यामुळे सक्षम प्रशासक तुळजापुरात असावं अशी पुजाऱ्यांनी मागणी केली आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नियुक्त झालेले हर्षवर्धन सपकाळ हे आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मस्साजोगला जाणार आहेत. यावेळी त्या परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.