
अतिरिक्त ६० जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना बावनकुळे यांनी त्यातील २९ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे. जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची ही २९ पदे काही वर्षांपासून रिक्त होती. तेथे आज नेमणूक झाल्याने समितीच्या कामकाजाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणे तातडीतने मार्गी लागतील अशी आशा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होते,सर्वांना आत टाकलं असतं. देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केल्यामुळेच आत्तापर्यंत 9 जणांना आतमध्ये टाकलं,पण,सरकार म्हणून तुम्ही काय केलंय,अशी विचारणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुखांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची . धमकी देणाऱ्यांकडून पुरावे नष्ट करण्याआधी आपण त्याचे स्क्रीनशॉट काढून स्क्रीन रेकॉर्डिंग केले होते. संबंधित घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी, 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या शेवटावरून माहिती दिली होती. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात शरद पवारांचा दबाव होता का? असा आता सवाल केला जातोय. यावर कोल्हे यांनी उत्तर देताना, आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता असे म्हटलं आहे.
राजापूर मतदारसंघातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावावेळी आपला सहभाग होता असे सांगितलं आहे. तर आपल्याला खासदारकी लढवायची होती. तेंव्हा राजन साळवींना राजापूरचे आमदार करून मला खासदार करण्याची डिल झाली होती असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केलाय
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावरून सध्या राज्यातील वातावरण तापलेलं असून चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान आता गणोजी शिर्के यांचे वंशज भूषण शिर्के यांनी केली प्रशांत कोरटकरवर कारवाईची केली आहे. तर शिर्के कुटुंब इंद्रजित सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची प्रतिक्रिया भूषण शिर्के यांनी दिली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पण या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय 1 मार्चला अंतिम निर्णय देणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हिंगोली दौऱ्यावर जाणार होते. तो आता रद्द करण्यात आला आहे. शरद पवार संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे भेट देणार होते. तसेच ते स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांच्या शताब्दी वर्षपूर्ती गौरव सोहळ्यात उपस्थित राहणार होते. पण अचानक शरद पवारांचा दौरा रद्द झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. यात आता तीन टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
मंत्रालयात आज पुन्हा एक आंदोलन करण्यात आलं असून एकाने सुरक्षा जाळीवर उडी मारली. यामुळे आता खळबळ उडाली आहे. तर आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली असून आंदोलकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
संतोष देशमुख खूनप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुख यांना फोन करत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच, तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंतीही केली आहे. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगला जाऊन धनंजय देशमुखांची भेट घेतली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चार गावांतील पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. लोकचळवळीतून ही योजना सुरू करणार आहोत.
राज्याचे नवीन वाळू धोरण ठरविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत येत्या 28 फेब्रुवारी रोजी अंतिम सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्यातून मागविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर चर्चा होणार आहे. नव्या वाळू धोरणात नव्या 167 सुधारणा विचारात घेतल्या जाणार आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सावंत यांनी त्या धमकीचे रेकॉर्डेड संभाषण आपल्या सोशल माध्यमावरही टाकले आहे. या धमकीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका. जोमाने पक्षांचे काम करा, असे आवाहन करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी माजी आमदार महादेव बाबर यांना फोन केला.
लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होणार आहे. महादेव बाबर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा निरोप विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला.
भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याला या प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. वैभव विरोधात कोणतेही ठोस पुरावे न आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी उल्हासनगर न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये केवळ दोनच आरोपींचा समावेश केला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक वी. डी. पाटील डॉ. आनंद पवार यांच्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रतीक भांगरे यांच्याकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिपाली झोले या रुग्णाचा गत महिन्यात मृत्यू झाला होता. भांगरे यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वीच डॉ. आनंद पवार यांनी सिव्हिल सर्जन यांच्यावर मारहाणीचे आरोपही केले होते.
या तिघांनाही सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मराठवाड्यातील दौरा सलग दुसऱ्यांदा रद्द झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हिंगोलीच्या नरसी येथे संत नामदेवांच्या दर्शनासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जनशताब्दी सोहळ्याला आज शरद पवार उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाची हिंगोलीत संपूर्ण तयारी करण्यात आली होती. ऐनवेळी पवारांचा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांना धमकी देऊन हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा अंतरंग पुन्हा दाखवला. जे पोटात ते कधी तरी ओठात येतेच. हिंदू आणि हिंदुत्व यात खूप फरक आहे. हिंदुत्ववादी हे हिंसक आणि मनुवादी असतात. त्यांना लोकशाही व भारतीय संविधान कधीच मान्य नसते. या भ्याड धमक्यांचा मी मागील आठवडाभर अनुभव घेतला आहेच. त्यांना हल्ली राजाश्रय असल्याने ते मोकाट सुटले आहेत. ही धर्मांधता RSS भाजपाच्या आशीर्वादाने सुरू आहे. बहुजनांचे अज्ञान हा त्यांचा मुख्य आधार असतो. इस्लाम खतरे में है म्हणणारे आणि हिंदू खतरे में है म्हणणारे दोन्ही प्रवृत्ती एकच आहेत. त्यांना संविधान प्रेमी व भारतीय नागरिकांनी सर्व पातळीवर रोखले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता व संघटक सचिव विकास लंवाडे यांनी केले आहे.
दहिवडी : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने जामीन मंजूर केल्या प्रकरणी ते आज न्यायालयात हजर होणार आहेत. जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते न्यायालयात हजर होणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे आकाशातनं उतरलेले विमान आहे ते रोज काहीतरी आकाशवाणी करत असतात दिल्लीमध्ये ते काय दिवे लावतात सगळ्यांना माहित आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे. निलम गोऱ्हे या महाराष्ट्राच्या संविधानिक सर्वोच्च पदावर आहेत. त्यांच्यावर आरोप करताना राऊतांना काय बोलायचं हे कळलं पाहिजे. संजय राऊत जेवढे बोलतील तेवढीच चार माणसं आमच्याकडे वाढतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोकाटे आज न्यायालयात हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला अपील कालावधी संपेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिला आहे. तर आपली आमदारकी अपात्र होऊ नये यासाठी कोकाटेंनी अर्ज दिला आहे. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार? याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान रामचंद्र गोरे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच घरात येऊन मारण्याची दिली धमकी देखील दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीने आरोप केला आहे. सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या स्वाभिमानीत असलेले सुजित मिणचेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ते 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिणचेकर हे शिवसेनेचे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. त्या फरार आरोपीला अटक करावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज मस्साजोगमधील ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.