
गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी २०२५ पासून उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता वेगळ्या मार्गाने मी आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. “मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार,” अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ बार्शी येथे पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे.
बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाकडे कोट्यावधीचा निधी वळवण्यात आला. प्रत्यक्षात काम न करता तब्बल 37 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. रस्त्याची कामे, तसेच विविध विकास कामे करण्यासाठी निधी उचलण्यात आला मात्र प्रत्यक्षात काम करण्यात आला नसल्याचे धस म्हणाले.
उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी सुरू होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी पूर्णपीठ स्थापन करून सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केली आहे. ही मागणी मान्य केली असून मराठा आरक्षणाच्या आता पहिल्यापासून पूर्णपीठा पुढे सुनावणी होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालवली असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला. पोलिस आंदोलकांना महामार्गातून दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी बीड (Beed) जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत निर्णय होणार, अशी चर्चा रंगली होती.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती.
'मी नैतिकदृष्ट्या दोषी असल्याचे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा मागावा. तर मी लगेच देईल', अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.
शरद पवार (Sharad Pawar) यांना चार दिवसांपूर्वी सर्दी-खोकल्याचा त्रास होता. वैद्यकीय सल्ल्यानुसार ते आराम करत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली. शरद पवारसाहेबांची प्रकृती उत्तम असून ते उद्यापासून लोकांना भेटायला सुरवात करतील, असे खासदार सुळेंनी सांगितले.
राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच धाराशिवमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. येथे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील जवळीक वाढत आहे. जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री कार्यालय असून याच भवनात आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी विशेष दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओमराजे निंबाळकर यांची खासदार म्हणून ही दुसरी टर्म आहे.
वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. दरम्यान त्यांनी, पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिका घेतली आहे. तर अजित पवार हेच माझ्या विषयी काय करायचे ते ठरवतील असेही मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.
वक्फ बोर्ड विधेयकाबाबत जोरदार राडा झाला असून काही विरोधक खासदारांचे निलंबन झाले होते. यानंतर आता वक्फ बोर्ड विधेयकाबाबतचा अहवालाचा मसुदा आणि सुधारित विधेयक जेपीसीच्या बैठक स्वीकारण्यात आले आहे. तर हे विधेयक उद्या सभापतींना सादर केले जाणार असून यावरून जेपीसी सदस्यांमध्ये मतदान झाले. अहवालाच्या बाजूने 16 आणि विरोधात 11 मते पडली.
भाजपा विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता असून पक्ष विरोधी भूमिका केल्याचा ठपका त्यांत्यावर ठेवण्यात आला आहे. पण याबाबत देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला मोहितेंकडून उत्तर देण्यात आले असून पक्ष विरोधी भूमिका मांडली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र हा खुलासा पक्षाला मान्य नसल्याचे सध्या दिसत असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे निदान झाले असून काही रूग्ण आढळले आहेत. या या आजाराचे निदान करण्यासाठीची ‘एनसीव्ही’ चाचणी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. तर यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.
भाजप ते भारत राष्ट्रनिर्माण पक्ष असा प्रवास करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांची आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. वाघमारे यांना राष्ट्रवादीत प्रवेश आणि उमेदवारी देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आता त्यांच्याच नेतृत्वात येथील पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे.
भाजप ते भारत राष्ट्रनिर्माण पक्ष असा प्रवास करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांची आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. वाघमारे यांना राष्ट्रवादीत प्रवेश आणि उमेदवारी देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आता त्यांच्याच नेतृत्वात येथील पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे
कोल्हापूर शहरासह अनेक उपनगरांची अवस्था पाहता कोल्हापूरची हद्द वाढ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र यावर फक्त चर्चा होते. पण कोणताच निर्णय होत नाही. यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढ विरोधात लोकप्रतिनिधी आडवे येतात, असे विधान केले आहे. यावरून आता खळबळ उडाली असून त्यांनी नावेच जाहीर करावीत अशी, मागणी होत आहे.
या राज्यात महागाई, भ्रष्टाचार सोमनाथ, संतोष देशमुख हत्यासारखे गंभीर प्रकरणे आहेत. यावरून चर्चा व्हायला हवी. मात्र सध्या चर्चा होते ती पालकमंत्री नियुक्त्यांवर. कृपया माझा यावरून अधिकचा अभ्यास नाही. यावरून प्रश्न विचारू नयेत, अशी विनंती सुळे यांनी केली आहे.
या हत्येवरून त्या मुलाचे कुटुंब आणि अख्खा महाराष्ट्र न्यायाची मागणी करत आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की राज्य सरकारने किमान नैतिकतेवर या कुटुंबाला न्याय द्यावा.
फक्त देवेंद्र फडणवीसच काय कर आम्ही कितीदा भाजप सरकारचे कौतुक केलं आहे. अश्विनी वैष्णव यांचे कौतुक केलं आहे. तर मध्यतंरी फडणवीस एकटेच काम करत होते. त्यावरूनही त्यांचे कौतुक केलं आहे. त्यामुळे अच्छे को अच्छा बोलना चाहिये. ही नैतिक जबाबदारी आहे.
जलजीवन मिशनवरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाना साधला असून यातून कामे झालेली नाही. यावरून योग्य ती कारवाई व्हावी, अशी फक्त माझीच मागणीच नाही, तर भाजपच्या नेत्यांची देखील आहे.
आम आदमी पक्षाने महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना, योगी सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ही खूप गंभीर बाब असून उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण देशातील लाखो लोकांना महाकुंभासाठी आमंत्रित केले. परंतु राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांनी व्यवस्था पाहायला हवी होती, त्यांनी उत्तर प्रदेशातून पळून जाऊन दिल्लीत राजकीय सभा घेण्यास सुरुवात केली. जी एक मोठी चूक आहे. भाजप सरकारने धार्मिक कार्यक्रमांना राजकीय बनवले आहे. तिथे व्हीआयपी आणि अब्जाधीशांची खुशामत केली जाते, हा सामान्य भाविकांवर अन्याय आहे. तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीला योगी आदित्यनाथ आणि प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांनी यासाठी राजीनामा द्यावा, असे आपने म्हटले आहे.
अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना सूचना. तुमच्या अडचणी असतील तर थेट माझ्याशी बोला. ज्या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आहेत. तिथल्या घटक पक्षांना विचारात घेवून काम करा. आपापल्या जिल्ह्यात पक्ष वाढीच काम करायचं आहे. पुढच्या काळात पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे. अनेक लोकांना पक्षात यायचं आहे. चांगल्या लोकांना पक्षात घ्या, पक्षाचं काम लोकांपर्यंत गेल पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी ही लागतील मात्र महायुती म्हणूनच एकत्रित काम करा. अशा सुचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले, 'यूपी सरकार फक्त कुंभमेळ्याच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करत होते. भाविकांच्या सुविधांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री स्नानासाठी गेले तेव्हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता, ज्यामुळे सामान्य भाविकांना त्रास होत होता. यूपीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी पक्षाचा प्रचार करण्याऐवजी भाविकांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे होते.
राजकीय गोटातून महत्त्वातची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेलेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजीनामाचा निर्णय दिल्ली दरबारी गेलाय का असे तर्कवितर्क लावले जात आहेत.
राज्यात जीबीएसचा पहिला बळी, केंद्राच 7 तज्ञांच पथक पुण्यात दाखल. पुण्यातील नांदेड गावातील विहिरीची पाहणी करणार.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरून केला आहे. आज या हत्येच्या घटनेला 50 दिवस झाले असून अजूनही एक आरोपी फरारच आहे. देशमुख कुटुंबाला न्याय कधी मिळणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.
इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची संचलन तूट २०१६-१७ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये तब्बल ४९६.४४ कोटींनी वाढ झाली आहे.
कोल्हापुरातील इचलकरंजीतील माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी एका कंपनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत कंपनीचे कुलूप तोडले. जुनी वसुली करण्यासाठी त्यांनी कुलुप तोडल्याची माहिती आहे. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे. गुंतवणूक न केलेली रक्कम परत न मिळाल्याने प्रकाश आवाडे मील मध्ये घुसले होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारात महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या काही तासानंतर भाजपच्या खासदार, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शाही स्नान केले.
महाकुंभमेळ्यात संगम किनाऱ्याजवळ झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. तर या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय आजचं शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. याच गर्दीमुळे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास संगम किणाऱ्याजवळ चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर प्रयागराजमधील गर्दी पाहता आखाडा परिषदेनं अमावस्येनिमित्त होणारं अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली आहे. तसंच जखमींना तत्काळ मदत करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.