
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी हे ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC)महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 येत्या 2 फेब्रुवारीला होत आहे. त्यापूर्वीच,पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.आम्ही तुम्हाला पेपर देतो, तुम्ही 40 लाख रुपये द्या, असा दावा नागपूरमधील एका कन्सल्टंसीने केल्याचे कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांना असे फोन आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.यानंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कुठलाही पेपर फुटलेला नसून सगळे पेपर सुरक्षित असल्याचं परिपत्रकाद्वारे जाहीर केलं.
मराठा आरक्षणाबाबत कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्या मान्य करण्यात येतील, अशी प्रतिक्रया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रया दिली आहे.
लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, अशी साद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना घातली आहे. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करीत निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या विधानानंतर पलटवार केला आहे. राज ठाकरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी शेलार यांनी केला.
एकनाथ शिंदे समिती बंद करण्यात आली हेाती. ती पुन्हा सुरू करण्यात यावी. वंशावळ समिती पुन्हा गठीत करावी. आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणीसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावणी मागण्यात आलेला आहे. त्यानंतरही काही नाही झालं तर मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची तारीख जाहीर करण्यात येईल, असे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांची भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. या वेळी धस यांनी जरांगे पाटील यांच्या काही मुद्यावर चर्चा केली. शिंदे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी धस यांच्यापुढे मांडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ईव्हीएमच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेणारी विधाने केली. त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरे हे उशिरा का होईना सत्य बोलले. आम्ही त्यावर बोललो तर आम्हाला राजकीय म्हणतात, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत माझ्या मुलाला काँग्रेस पक्षाची तिकिट मिळावे, यासाठी रमेश चेन्नीथला यांचे नाव पुढे करून मुंबईतील एका नानाने चार कोटी रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे. रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसवर आरोप करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
जे इतके वर्षे महाराष्ट्राचे राजकारण करत आले. ज्यांच्या जिवावर उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ हे मोठे झाले. त्या शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागा मिळतात, हे सगळे न समजण्यापलीकडची गोष्ट आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
ईव्हीएमच्या मुद्यावर मी पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भेटणार आहे. ईव्हीएमच्या संदर्भातील माझ्याकडचे पुरावे मी दाखवले तर या लढ्याला आणखी ताकद येईल. मारकडवाडीसंदर्भात मी सोमवारी किंवा मंगळवारी राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी कोल्हापूरची हद्दवाढ होणारच असे म्हटले आहे.
महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर 30 जाणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 60 हून अधिक जखमी झाले आहेत. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. तर कुंभमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला त्याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. पण हेच दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर चॅनलवाल्यांनी तमाशे केला असता असे म्हटलं आहे
बीडच्या बदनामीवरुन डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली. दहशतीच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली, असंही खासदारांनी सांगितलं
राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यातून राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपने आरोप केलेले सर्व जण हे भाजपसोबत आण मंत्रिमंडळात आहेत.
भाजपने अजित पवार यांच्यावर आरोप करत आत टाकू असा इशारा दिला होता. पण आत टाकू असे म्हणत भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. आत टाकू याचा अर्थ मंत्रिमंडळ होत हे माहित नव्हते, असा टोला लगावला.
एनटीएसच्या मिल्सवरून केंद्र सरकारचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी आपण बिझनेस करण्याचे ठरवले होते. आणि आपण कोहिनूर मिल्समध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे एका कंपनीशी बोलणं केलं आणि त्यांनी पैसे भरून कंपनी घेतली. पण नंतर 2008 मध्ये आम्ही त्यातून भागिदारीचे पैसे घेत बाहेर पडलो. पण ईडीची नोटीस आली. पण टॅक्सचे पैसे भरून विषय संपवला. त्यामुळे मी असा घाबरून जाणारा नाही.
सगळ्यांनी आप आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. पण मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली. जे भूमिका बदलतात त्यांना विचारत नाहीत. पण भूमिकेवरून तुम्हाला विचारणाच. हल्लीच्या पत्रकारांना किती गाढा अभ्यास आहे हे पाहावे लागेल, असे ही राज ठाकरे म्हणाले.
पुलोदमध्ये देखील शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली त्यावेळी देखील भाजप यांच्याबरोबर होते. 1977 -1978 मध्ये काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता.
सतत भूमिका बदलण्याच्या टीकेला आज राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जनसंघाचे नाव घेतले. याच जनसंघाचे नंतर भारतीय जनता पक्ष झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. हिंदू आणि हिदुत्वावर भाजपने राजकारण केले. तर अटलबिहारी यांनी आपली भूमिका बलली.
माढ्याची परळी होऊ देणार नाही, असं सूचक विधान करून माढ्याच्या राजकारणात मोठी खळबळ आमदार अभिजित पाटील यांनी उडवून दिली आहे. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना वाळू माफियांनी दमदाटी करत धक्का बुक्की केल्यावरून त्यांनी हे विधान केलं आहे. माढ्यात अजूनही एक दोन अक्काचे अक्का आहेत. त्यांना शोधून काढू असाही इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे हे महायुती सरकारमधील मंत्री त्यामुळे त्यांना भेटणं म्हणजे काही चोरी नाही. त्यामुळे धनंजय मुंडेंंच्या बाबतीत अजित पवारांची भूमिका अधिकृत असेल. फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
सरकारच्या असत्य कथन व वर्तनाच्या निषेधार्थ मुक आंदोलन. पुण्यात पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करत आहेत. काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मधील घोटाळे विरोधात बाबा आढावा यांनी आत्मकलेश आंदोलन केलं होत..
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याच बैठकीत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत भाजप- शिवसेना आणि काँग्रेस आमदार भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला आदित्य ठाकरे येणार का याकडे सर्वांचेंच लक्ष लागले आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज दुपारी जरांगे हे मराठा समाज बांधवासाठी चर्चा करुन उपोषण सुरु ठेवायचे की नाही, याबाबतचा निर्णय
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. धोडी हे काही दिवसापासून बेपत्ता आहेत. पाच संशयित फरार आरोपींपैकी 2 आरोपी राजस्थानला पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांन पकडण्यासठी पोलिसांची पथक परराज्यात रवाना झाले आहे. परराज्यातील दारू तस्करी करण्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अपहरण करून त्यांच्या घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत आत्तापर्यंत जे आरोप करण्यात आले आहे. याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे. खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीर क्षीरसागर, अंजली दमानिया यांनी देशमुख हत्येबाबत केलेल्या आरोपावर सरकारने चर्चा केली पाहिजे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे 51 दिवसापासून कुठे आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
मुंबईत आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा पार पडणार आहे. वरळी डोम येथे साधारण अकरा वाजताच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बीडमधील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. तथ्य असेल तरच कारवाई केली जाईल ज्यामध्ये तथ्ये नसेल तिथे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. सध्याची बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंशी वाल्मिक कराडची जवळीक असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजितदादांचा आजचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. सध्या पहाटे ते बीडमध्ये पोहोचले असून त्यांनी विविध कामांचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.