Maharashtra Politics live : मोठी बातमी! कट्टर जरांगे समर्थकानं घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Sarkarnama Headlines Updates 12 December 2024: आज गुरुवार ता. 12 डिसेंबर2024 महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Eknath Shinde, Manoj Jarange
Eknath Shinde, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

मोठी बातमी! कट्टर जरांगे समर्थक नेत्यानं घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

कट्टर मनोज जरांगे पाटील समर्थक असलेल्या गंगाधर काळकुटे यांनी गुरुवारी (ता.12) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मराठा समाजाकडून शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तसेच मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत काळकुटे यांनी शिंदेंना शुभेच्छाही दिल्या.

लोकशाहीवर हल्ला - स्टॅलिन

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक विधेयक’ संसदेत मांडण्यास मंजुरी दिली आहे. ही अव्यवहार्य आणि लोकशाहीविरोधी कृती प्रादेशिक आवाज पुसून टाकेल, संघराज्य नष्ट करेल आणि प्रशासनाला बाधा आणणारी कृती आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक हे लोकशाहीवर हल्ला आहे, असे ट्विट तमिळनाडूचे मुख्यमंत्री ए के स्टॅलिन यांनी करत एक राष्ट्र, एक निवडणूक विधेयकाला विरोध केला आहे.

...तर देशात हुकूमशाही येईल

काँग्रेस खासदार गुरजीत सिंह औजला म्हणाले "एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक मंजूर झाले तर आपला देश हुकूमशाहीकडे जाईल. कारण दुसऱ्या राज्यात निवडणूक असल्याने सरकार जबाबदारीने वागते. मात्र पाचवर्षातून एकदाच निवडणूक झाली तर सरकारची जबाबदारी संपेल

अमित शाह शरद पवारांच्या भेटीला

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर आता गृहमंत्री अमित शाह हे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.

अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल : टाडा कोर्ट

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील त्याच्या भूमिकेसाठी अबू सालेमला पूर्ण 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. असा निर्णय न्यायालयाने देत त्याची लवकर सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली. मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी याला दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने 25 वर्षांची शिक्षा भोगावी, असा निर्णय दिला आहे

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ यांचा सुपारी देवून खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी देवून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींना गुरुवारी (ता. १२) वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

EVM विरोधा NCPSP कोर्टात जाणार नाही

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवार हे त्यांचा पराभव ईव्हीएम हॅक केल्यामुळे झाल्याचा दावा करत आहेत. काही उमेदवार कोर्टात देखील गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. पक्ष म्हणून कोर्टात जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नाही.मात्र काही उमेदवार वैयक्तिक कोर्टात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

BJP : 14 मंत्रिमंडळ विस्तार नाही? 

14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तसेच महायुतीमधील नेते मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता होती. मात्र, शपथविधी सोहळ्याबाबत अजूनही संभ्रम आहे. दिल्लीत अजूनही भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम झाली नाही. मंत्रिपदांच्या नावांबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे शपथविधीबाबात संभ्रम आहे.

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होईल, असे अजित पवार म्हणाले. 16 डिसेंबरला विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने त्याआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

Devendra Fadnavis Met BJP Leader in  Maharashtra Sadan :  फडणवीसांच्या भेटीला उदयनराजे, तावडे महाराष्ट्र सदनात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसापासून दिल्लीत आहे. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीसाठी महाराष्ट्र सदनात भाजपचे अनेक नेते दाखल झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचीटणीस विनोद तावडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री भागवत कराड सदनात पोहोचले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis met PM Modi: एकनाथ शिंदे नाराज नाहीत : फडणवीस

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राला गतीशील ठेवण्याच्या सूचना मोदींनी दिल्याचे फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत तिढा नसून एकनाथ शिंदे हे नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले.

NIA Raid News
NIA Raid NewsSarkarnama

Amravati NIA News: अमरावतीत NIAने एका तरुणाला ताब्यात घेतले 

एनआयएने (NIA)आज देशात छापेमारी केली आहे. 17 शहरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कारवाई करीत काही जणांना ताब्यात घेतले आहे. अमरावतीमधून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु आहे. गेल्या सहा महिन्यापासून तो अमरावतीत राहत असल्याची माहिती आहे तो पाकिस्तानमधील एका संघटनेशी त्यांचा संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करीत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama

Ajit Pawar ON Sharad Pawar Birthday:  राजकारणापलिकडे काही नाती असतात.,,, मी घरचाच, बाहेरचा नाही : अजित पवार  

देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर दादा-साहेब यांची पहिल्यांदा एकत्र आले. दिल्लीतील 10 जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांच्या झालेल्या या भेटीकडे देशाचे लक्ष लागले होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या भेटीबाबत अजितदादांना माध्यमांना संवाद साधला. "राजकारणापलिकडे काही नाती असतात. ही राजकीय भेट नव्हती. वाढदिवसानिमित्त त्यांचे दर्शन घेतले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार, ससंदेचे अधिवेशन, नागपूरचे हिवाळी अधिवेशन याबाबत चर्चा झाली," असे अजितदादांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Today birthday News :  दिल्लीत पवार कुटुंबिय एकत्र,  शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षांव

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पवारांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षात होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अन्य सहकाऱ्यांसह शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले आहेत. अजितदादासोबत खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, आमदार छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत केले. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, कन्या रेवती सुळे, प्रतिभाताई पवार यावेळी उपस्थित होत्या. ही कोटुंबिक भेट असल्याचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले.

Mahayuti meeting : कुणाचा किती अन् कोणती खाती मिळणार

Mahayuti Meeting 12 december 2024: महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला काल रात्री नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजपला जवळपास २० मंत्रीपद मिळण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० मंत्रीपद मिळणार आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. त्या बैठकीत खातेवाटप फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. भाजपला मिळणाऱ्या खात्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खात्यांची नावे आज महायुतीच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Today Sharad Pawar birthday : अजितदादांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरुन अजितदादांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा,"असे त्यांनी म्हटलं आहे.

Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ? आज महायुतीची महत्वाची बैठक

Mahayuti Meeting 12 december 2024: राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाले पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने अडीच वर्षांसाठी फिरतं मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल (बुधवारी) दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. यात तिन्हीही नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला किती मंत्रिपद द्यायची, कोणती मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा करण्यात आली.गृहमंत्रिपद कोणाला मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com