Maharashtra Political Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू, यासह आज गुरूवार 05 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

संभाजीनगरच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपनं घेतले तब्बल १६ अर्ज 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तब्बल १६ अर्ज घेण्यात आलेले आहेत. त्यातील आठ अर्ज महापौर आणि आठ अर्ज उपमहापौर पदासाठी आहेत. आता एका जागेसाठी आठ अर्ज भाजपने घेतले कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यामुळे उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना जितके इच्छुक आहेत, त्या सगळ्यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना भाजपकडून दिल्या जातील का? अशी चर्चा सुरू आहे.

 ...म्हणून आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही!

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईची महापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी घेतली जालना पोलीस अधीक्षकांची भेट

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील घातपात प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणेची जामिनावर सुटका झाली आहे. जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत या प्रकरणी त्याच्यासह जरांगेंची नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली होती. आता याप्रकरणी जरांगे पाटलांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय बदलला; रिपब्लिकन सेनेने दिला होता आंदोलनाचा इशारा

कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडीट देण्याचा घेतला होता निर्णय

कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने केला ऐच्छिक निर्णय

नाशिक जिल्ह्यातील कॉलेज व विद्यार्थ्यांना केला होता निर्णय लागू; रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिला होता आंदोलनाचा इशारा

कुंभमेळ्यात काम करण्यासाठी केला होता निर्णय लागू; विद्यार्थी संघटना झाल्या होत्या आक्रमक, कुलगुरूनां दिले होते निवेदन

Delhi News : PM मोदी - भारताचा वेगाने विकास होतोय; विरोधकांनी केला सभात्याग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू मोदी म्हणाले. भारताचा वेगाने विकास होत आहे.

आपल्याला ना थांबायचंय, ना मागे वळून पाहायचंय अजून प्रगतीपथावर वाटचाल करायची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी राज्यसभेतील खासदारांनी सभात्याग केला.

Delhi News : PM मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांच्या गदारोळ

पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजी जोरदार गदारोळ

राज्यसभेत विरोधकांची घोषणीबाजी

'हुकुमशाही चालणार नाही', विरोधकांच्या घोषणाबाजीने राज्यसभेत वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

काल बुधवार (ता.4) लोकसभेत झालेल्या गोंधळामुळे पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव च्या दरम्यान आपले भाषण करू शकले नव्हते.

विरोधकांच्या गोंधळादरम्यान पंतप्रधानांनी देश का नौजवान देश को आगे बढा रहे है असे सांगितले.

Navi Mumbai News : नवी मुंबईच्या नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्याशी भेटून संवाद साधला

नवी मुंबईच्या नगरसेवकांनी भाजप वरिष्ट नेते गणेश नाईकांची भेट घेतली.

नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर झाल्यानंतर सुजाता सुरज पाटील यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट घेतली यावेळी भाजपचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

कामे मंजूर करून सत्ताधाऱ्यांकडून खोटी बिलं काढली जातात, शेकाप नेते जयंत पाटीलांचा आरोप

रायगड जिल्ह्यात शेकाप शिवसेनेत रंगला कलगीतुरा

सत्ताधारी कामे मंजूर करून अक्षरश: खोटी बिलं काढतात असा आरोप शेकाप नेते जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

गेली 15 वर्षे शेकाप जिल्हा परिषद सत्तेत होता

खोटी बिले काढणारा शेकाप आणि भाजपातील पाटील कंपनीचं असा पलटवार जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यातील 470 ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार

जालना जिल्ह्यात 470 ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार आहेत.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याची जिल्ह्यातील सरपंच संघटनेची मागणी केली गेली आहे.

राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरपंच संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सीईओना यांनाही निवेदन दिले आहे.

उपमहापौर पदावरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली

चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर वडेट्टीवार गटाचा दावा निश्चित झाला असतानाही धानोरकर गटाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांनी अर्ज सादर केल्यानंतर धानोरकर गटातील राहुल चौधरी यांनीही उमेदवारी दाखल केली. एकाच पदासाठी दोन गटांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Mumbai live: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची समस्या ताजी असताना मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

Sanjay Raut: पार्थ पवारांनी चौकशीला समोरं जावं : संजय राऊत

मुंढवा जमीनप्रकरणी हायकोर्टानंही ताशेरे मारले आहेत. त्यामुळे पार्थ पवारांनी चौकशीला समोरं जावं आणि क्लीन व्हावं असा सल्ला ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी पार्थ पवारांना दिला आहे. सही नसणं याला बेनामी व्यवहार म्हणतात, असा टोलाही त्यांनी यावर लगावला आहे.

वडेट्टीवार गटाकडून आक्षेप याचिका मागे

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाने गट नोंदणी वेळी विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपाच्या विरोधात कोर्टात याचिका केली होती. मात्र, ही याचिका मागे घेण्यात आली. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी मिटवले. महापौर पद धानोरकर गटाला तर उपमहापौर पद वडेट्टीवार गटाला मिळणार आहे.

अजित पवारच्या विमान अपघाताचा तपास एएआयबीकडून सुरू

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून वेगाने सुरू झाला आहे. २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट ४५ विमान कोसळले होते. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला होता.

नवी मुंबईच्या महापौर पदी सुजाता पाटील 

भाजपच्या नगरसेविका सुजाता पाटील यांची नवी मुंबईच्या महापौर पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.एकनाथ शिंदेंच्या उमेदवार सरोज पाटील यांनी माघार घेतली. त्यांनी आपला अर्ज आज मागे घेतला. उपमहापौर पदी दशरथ भगत यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर

राज्य विधिमंडळाचे 15 आमदारन लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामध्ये बाबासाहेब देशमुख, परिणय फुक, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम आदींचा सहभाग आहे. 

Nagpur News : नगरसेवक वडेट्टीवारांच्या निवासस्थानी दाखल

चंद्रपुरातील वडेट्टीवार गटातील नगरसेवक नागपुरात दाखल झाले आहेत. हे सर्व नगरसेवक वडेट्टीवारांच्या नागपुरातील निवासस्थानी गेलेत. वडेट्टीवार चंद्रपुरात जाणार असून हे सर्व नगरसेवकही त्यांच्या सोबत जाणार असल्याची माहिती समोर येतेय. तर आज महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे...

Ladaki Bahin Yojna लाडकीच्या जागी पुरूषाचे अर्ज, 710 अर्ज रद्द |

नंदुरबार जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत ७१० पुरुषांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आलाय. अर्ज भरताना लिंग निवडताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे हे अर्ज बाद केलेयत. या अर्जांची आता पुन्हा छाननी सुरूय. मात्र यामुळे प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai Mayor News भाजपने नगरसेवक ६६ अज्ञातस्थळी हलवले

नवी मुंबईच्या तेराव्या महापौर निवडीची आज प्रक्रिया पार पडणार आहे, यात शिंदेसेनेनंही महापौर तसेच उपमहापौर मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्याने ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे, मात्र पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचा महापौर बनेल अशी शक्यता आहे. त्यामुळेच कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी भाजपाने आपल्या 66 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवले आहे

Barmati Pawar Family : बारामतीत पुन्हा पवार कुटुंबामध्ये चर्चा

आज बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शरद पवारांसह प्रतिभा पवारही बैठकीला उपस्थित राहणार असून पार्थ, जय पवारांसह युगेंद्र पवाराही बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. कालही पवार कुटुंबात शरद पवार, पार्थ व जय पवार यांच्यात चर्चा झाली होती.

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीमुळे एसटी प्रशासनाचे मोठे नुकसान

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी विभागाला मोठा फटका बसला आहे. वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या 139 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 163 बसेस अडकल्या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान एसटीचं झालं आहे.

लोणावळ्यात वाहनांच्या 5 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल 32 तासांनंतर सुरू झाली आहे. मात्र, सध्या लोणावळ्याजवळ अजूनही 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 20 ते 22 किलोमीटरची दीर्घ वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहनचालक आपल्या वाहनातच झोपले होते. रात्री उशिरा वाहतूक खुली झाल्याची माहिती त्यांना नव्हती. आता पोलीस वाहनचालकांना झोपेतून उठवून वाहने पुढे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत.

7 तारखेला जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिवगंत नेते अजित पवारांचं नाव देण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे याबाबत शिंदेंना विचारणा होईल असेही ते म्हणाले.

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर गॅसचा टँकर हटवण्यात आला असून आता मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे तब्बल ३० ते ३२ तासांनंतर वाहतूक सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com