Maharashtra Live Updates : हिंदूंनी छोटी छोटी कामे करणं सोडून दिलं आहे : मोहन भागवत

ZP panchyat samati Elections Voting : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितांसाठी काल मतदान पार पडलं असून आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यासह राज्य आणि देशभरातील घडामोडी एकाच क्लिकवर आज रविवार 08 फेब्रुवारी रोजीच्या दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Mohan Bhagwat : हिंदूंनी छोटी छोटी कामे करणं सोडून दिलं आहे : मोहन भागवत

बाहेरून आलेले लोक छोटी-छोटी काम करून समाजात मिसळतात. पण हिंदूंनी छोटी छोटी कामे करणं सोडून दिले आहे. शेतीच्या कामाला मोल आले तर रोजगार वाढेल. रिकामं डोकं सैतानाचं घर बनतं, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, असा धोक्याचा इशाराही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.

मुळशीत 64 टक्के मतदान

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मुळशी तालुक्यात 63.93 टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुळशी तालुक्यात मुख्य लढत आहे.

भाजपकडे ओरिजनल असे काही नाही, रितू तावडे काँग्रेसच्या - संजय राऊत

बईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ऋतू तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपकडे ओरिजनल असे काही नाही, रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत.

बारामतीमधील मतदानात घट 

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून, २०१७ च्या तुलनेत फक्त १.११ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात यावेळी मतदानात लक्षणीय घट झाली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. त्या म्हणल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - २०२६ या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.

मोदी यांनी भारताला अमेरिकेचे गुलाम केले - संजय राऊत

'अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी ठेवणारा ‘नियतीशी करार’ केला. मोदी यांनी हा करार मोडून भारताला अमेरिकेचे गुलाम केले', अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले.

शरद पवारांची पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार हे येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांची मानसिकता आता थांबायला पाहिजे अशी असल्याचं म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "संजय राऊत यांनी मविआच्या अनुषंगाने जे वक्तव्य केलंय, त्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल. मात्र, मुळात असं आहे की, शरद पवारांची पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? याबाबत राऊतांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता, असं सपकाळ म्हणाले.

10 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार

अजित पवारांच्या निधनानंतर ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्या 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

राजस्थानच्या कोटा शहरात इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या कोटा शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेली एक इमारत कोसळून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापुरात ईव्हीएम फोडलं, मतदान बॅलेटवर घेण्याची मागणी

भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू असताना नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करत एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम जमीनीवर आपटून फोडल्याची घडना घडली.

Maharashtra Live Updates : नगरपालिका आणि महापालिकेप्रमाणेच 'झेडपी'मध्येही महायुतीला यश मिळणार - रक्षा खडसे

राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं आहे. उद्या 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. अशातच निकालाआधीच राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकेतील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही महायुतीला यश मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com