

कोल्हापूर महानगरपालिकेत आज काँग्रेसकडून नगरसेवक राजेश लाटकर यांचा विरोधी पक्ष नेते पदासाठी अर्ज भरण्यासाठी सोबत आलेल्या कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित नगरसेवकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. संपूर्ण प्रकरणानंतर महापालिकेसह सदर बाजार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या कार्यकर्त्यांचे नाव अनिल रावळ असून ते सदर बाजार परिसरात राहतात. तसेच ते महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी चालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न गंभीर असल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्याऐवजी महापालिका प्रशासन आता नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप देत आहे. त्यामुळं नागरिकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्या पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून त्या बैठकीतला नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पालकमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी पुण्यात सीएम देवेंद्र फडणवीसांची निर्णायक बैठक होणार आहे.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचे निधन झाले होते. त्यानंतर काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच बारामती विमानतळाबाबत आणि विमान कंपनीच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळावरील सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आज DGCA ची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाल्याचे पहायला मिळाले.
कल्याण-डोंबिवलीत महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. महापौर हर्षाली थविल चौधरी स्वतः विविध भागांना भेट देत कामाचा आढावा घेत आहेत. खडकपाडा परिसरात पाहणीदरम्यान त्यांनी काही दुकाने आणि हॉटेलसमोर फुटपाथवर कचऱ्याच्या पिशव्या आढळल्या. घंटागाडी येण्यापूर्वीच हा कचरा बाहेर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
राज्यात सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. कडाक्याच्या उन्हात हजारो उमेदवार मेहनत घेत आहेत. बीड येथे १७४ जागांसाठी प्रक्रिया सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. धावण्याच्या चाचणीदरम्यान एका तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "रोहित पवारांनी पुन्हा शंका उपस्थित केल्यात, अपघाताची पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही, पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केलेली. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला कल्पना देऊन, या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असं सांगितलं होतं, त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करुन त्यासंदर्भातलं पत्रही मला पाठवलं आहे. आता सध्या चौकशी सुरू आहे."
राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठं बदल करण्यात आलाय. आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता संपली असून, एनए (नॉन-अग्रीकल्चरल) परवानगी घेण्याची सुद्धा गरज राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात आज दिल्लीत साधारणतः 40 मिनिटांची बैठक झाली. या बैठकीत विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे समजते. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते.
माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असतील, असा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत, असाही दावा राम सातपुते यांनी केला आहे.
नागपूर 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत सामूहिक बलात्कारानं हादरलं आहे. नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आरोपीच्या घरात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, राज ठाकरे यांना चांगलंच डिवचलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी काही प्रश्न केले होते. त्यावरून कोश्यारी यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. "संघाच्या कार्यक्रमात आलेले ते मोदींना घाबरून नाही आले. मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मला असं वाटतं आहे की, राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी घाबरलं नाही पाहिजे, त्यांनी मोंदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. मोदींजींसाठी सर्व जनता समान आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आहात, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, घाबरायचं असेल, तर चुकीचे काम करण्यास घाबरा," असंही भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
अहिल्यानगर मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या दीर्घकालीन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील बौद्ध विहार मंजुरीच्या विषयावर सविस्तर, सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमध्ये विजय सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केलं.“निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली… पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप बेरीज काय झाली अति तिथे माती होते… अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात,”असं म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर मोहोळ तालुक्यातील भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. जिल्हा परिषद व पंचायत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा दारुण पराभव केलेले भाजपचे सचिन जाधव यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून कृषी विभागाद्वारे राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स आत्महत्येस कारणीभूत घटकांचा अभ्यास करणार आहे.
लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, महापौर पदी जयश्री सोनकांबळे, तर उपमहापौरपदी ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली , लातूर महापालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत मनपावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली करण्यात आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेते,पदाधिकाऱ्यांवर भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी असे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 69 जणांची यादी तयार केली असून त्यांच्यावर तब्बल सहा वर्षांचा निलंबन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याची चर्चा आहे.
रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार सुरु होतो. त्यांना डाॅक्टरांनी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते उपचार घेत आहेत. त्यांना श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.