Maharashtra Political Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, यासह आज 31 जानेवारी रोजीच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

पुणेकरांवर १० टक्के करवाढीची कुऱ्हाड?; स्थायी समितीपुढे प्रस्ताव

गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या मिळकतकरात वाढ केली नाही, उत्पन्न वाढत नसल्याने महापालिका प्रशासनाने अखेर मिळकतकरामध्ये १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर येत्या सोमवारी (ता. २) महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम हे निर्णय घेणार आहेत. मात्र, अंतिम निर्णय हा २० फेब्रुवारीपूर्वी मुख्यसभेत घ्यावा लागणार आहे. त्यावेळी सत्ताधारी भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Sunil Tatkare On Sunetra Pawar कठीण परिस्थितीत वहिनींनी आमची विनंती मान्य केली : तटकरे 

अतिशय दु:खाच्या प्रसंगात सुनेत्रा वहिनी यांचा शपथविधी घेण्याची वेळ आमच्यावर आली. जनतेची व सर्व आमदारांची हीच ईच्छा होती की त्यांनी जबाबदारी स्विकारावी. कठीण परिस्थितीत वहिनींनी आमची विनंती मान्य केली. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सूनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिली.

Sunetra Pawar to take oath as Deputy Chief Minister of Maharashtra : सुनेत्रा पवार यांनी घेतील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितीत होते.  राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे.

Sunetra Pawar will take oath as Deputy Chief Minister : लोकभवनात शपथविधीसाठी तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी पाच वाजेची वेळ देण्यात आली होती. लोकभवनात शपथविधीची सर्व तयारी झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार विधानभवनातून लोकभवनात निघाले आहेत.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी 

 सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज होणार आहे. काही वेळातच हा शपथविधी होईल. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. त्याआधी सुनेत्रा पवारांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Videep Jadhav : विदीप जाधव यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांत्वनपर भेट दिली.

Chandrapur Municipal Corporation : आम्हला जो महापौरपद देईल, त्यासोबत आम्ही जाणार; चंद्रपुरात ठाकरे सेनेची रोखठोक भूमिका

चंद्रपूर महापालिकेत जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला महापौर पद देईल, त्यासोबतच जायचे, ही आमची भूमिका असल्याची माहिती शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा देखील तोच आग्रह आहे, की चंद्रपूरमध्ये शिवसेनेचा महापौर व्हावा. त्यासाठी भाजप असो की, काँग्रेस हे दोन्ही पर्याय आमच्याकडे खुले असल्याचे संदीप गिर्हे यांनी सांगितले.

Nandurbar NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास बेरीजचे गणित होणं अधिक सोपे होणार; अभिजित मोरे

'राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत आतापर्यंत निर्णायक भूमिका बजावत होते ते केवळ अजित पवार. मात्र त्यांच्या निधनानंतर आता या संपूर्ण प्रक्रियेचा अधिकार कुणाकडे असावा, यावर राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वे अधिकार आधी सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपुर्द करावेत, त्यानंतर सुमित्रा पवार जो निर्णय घेणार तो नंदुरबार जिल्ह्याला मान्य राहील,' असे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Dhule Update : कृषी उत्पन्न बाजार समिती बंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. बाजारसमितीमधील आज संपूर्ण कामकाज बंद ठेवून, व्यापाऱ्यांसह सर्वांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे.

Sunetra Pawar DCM Oath : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी बिनविरोध निवड, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. परिणामी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आता सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

Shashikant Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेतृत्व कोण करणार? शशिकांत शिंदे म्हणाले...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा होती, बैठका झाल्या होत्या, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर, नेतृत्व कोण करणार यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिकांत शिंदे यांनी, जर तरच्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षात अजितदादा नाहीत. काही भूमिका ठरल्या होत्या. दादा नसल्यानंतर काय करायचं, चर्चा करू मग निर्णय घेऊ. त्यांनी काय करायचं त्यांनी कसा रिस्पॉन्स द्यायचा हा त्यांचा निर्णय आहे, असे म्हटले आहे.

NCP Politics : 'अजित पवार राष्ट्रवादीत, पटेल, तटकरे अन् भुजबळ निर्णय घेताना दिसत आहेत'

अजित पवार यांच्या निधनानंतर, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित असरल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा देखील जोर धरत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण जयंत पाटील यांनी आता केलेल्या एका विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे. 'सध्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ घेताना दिसत आहे,' असे सूचकपणे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या गट नेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गट नेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत प्रशांत शितोळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. प्रशांत शितोळे यांनी प्रभाग क्रमांक 32 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल शितोळे यांचा पराभव केला होता.

Nanded Politics : नांदेडमध्ये सर्व पक्षांतर्फे शोकसभेचे आयोजन; अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. नांदेडमध्ये सर्व पक्षीयांतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सर्व पक्षीयांतर्फे नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. अनेक नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Bhiwandi Municipal Corporation Election : ठाण्यातील सत्तासंघर्ष पेटला, भिवंडीतील समाजवादीचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील महापौरपदाचा सत्तासंघर्ष नाट्यमय वळणावर आला असून, या ठिकाणचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक हे ऐनवेळी नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरतोय की काय, अशी चर्चा सुरू आहे. भिवंडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक असून बहुमताचा आकडा हा 46 इतका आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन करून महापौर पदावर दावा केला होता. या आघाडीत काँग्रेसचे 30, समाजवादी पक्षाचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक, असा मिळून एकूण 48 सदस्यांचा गट असल्याचा दावा करण्यात आला होता.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवडीचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते छगन भूजबळ मांडणार आहे.   

दरबार हॉलमध्ये तयारीला वेग

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी लोकभवनात (राजभवनात) हालचाली सुरु झाल्या आहेत. दरबार हॉलमध्ये तयारीला वेग आला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहेत. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी पाच वाजता शपथविधी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड  करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाची लवकरच बैठक सुरु होत आहे. विधीमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार हे निश्चत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली होती: जयंत पाटील 

सुनेत्राताई विलीनीकरणाबाबत पुढे निर्णय घेतील - भुजबळ

सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल.

गटनेतेपदी दीपक राठोड

जालना महापालिकेच्या शिवसेना गटनेतेपदी दीपक राठोड तर, प्रतोदपदी दुर्गेश काठोटीवाले यांची निवड करण्यात आली. महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने 12 जागांवरती विजय मिळवला होता.

राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती - शरद पवार

सुनेत्रा पवार शपथ घेणार याची मला माहिती नाही. सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलं आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. १२ तारखेला याबाबतची घोषणा होणार होती. मात्र, त्याआधीच हा मोठा आघात झाला, असे शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार गेले, त्यांना परत आणू शकत नाही - शरद पवार

शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणासाठी गेल्या चार महिन्यापासून दोन्हा पक्षात चर्चा सुरु होती. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मी या चर्चेत सहभागी नव्हतो. याबाबत येत्या 12 तारखेला विलिनीकरणाबाबत चर्चा होणार होती. अजित पवार गेले, त्यांना परत आणू शकत नाही."

अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल - शरद पवार

आज सकाळी शरद पवार यांनी बारामतीतून पत्रकार परिषद घेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांना पक्षाने आणि बारामतीकरांनी अखंड साथ दिली, अशी काम करणारी कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते हा मोठा आघात आम्हा सर्वांवर झाला आहे. मात्र, या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल. आमच्या कुंटुबातील नवी पिढी नक्की हे करेल असा विश्वास आहे, असं पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी त्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आज दुपारी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पवार यांची निवड केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com