OBC Leader Laxman Hake News : मनोज जरांगेंची लायकी बिग बाॅसमध्ये जाण्याची, मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का ?

Send Manoj Jarange Patil to Bigg Boss, comments OBC activist Laxman Hake : राज्य सरकारकडून हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना हा अधिकार कोणी दिला ? त्यांना कायदा कळतो का ? असा सवाल हाके यांनी यानिमित्ताने केला.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

OBC Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसापासून उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके चांगले आक्रमक झाले आहेत. जालना येथे माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांची लायकी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्या सांगण्यावरून जीआर काढतात, असा थेट आरोप केला. जरांगे यांची लायकी बिग बॉस मध्ये जाण्याची आहे, त्यांना तिकडे पाठवले पाहिजे, असा टोलाही हाके यांनी लगावला.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली असताना राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. (OBC Reservation) ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुमचा भुगा करू, असा इशारा त्यांनी काल दिला होता. तर अंतरवाली पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्रीत ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी समितीकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रा. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. मनोज जरांगे पाटील प्रत्येक आंदोलनाच्या वेळी नव्या मागण्या करतात आणि त्यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीआर काढतात याची लाज वाटते. जरांगे पाटील हे सोंगाड्या आहेत त्यांना खरंतर बिग बॉस मध्ये पाठवले पाहिजे. यापेक्षा त्यांची मोठी लायकी नाही, अशी टीकाही हाके यांनी केली.

Laxman Hake
OBC reservation : ओबीसींना पाडून मनोज जरांगेंचा जातीच्या वर्चस्वासाठी लढा; लक्ष्मण हाकेंनी सर्वच काढलं...

राज्य सरकारकडून हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना हा अधिकार कोणी दिला ? त्यांना कायदा कळतो का ? असा सवाल हाके यांनी यानिमित्ताने केला. (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांचाही समाचार हाके यांनी घेतला.

माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण शिवसेनेचे उद्धव ठाकरे या नेत्यांना अंतरवाली सराटीत जायला वेळ आहे. पण ओबीसींच्या आंदोलनाकडे ते कानाडोळा करतात, असा आरोप करत हे नेते जातीयवादी असून त्यांना ओबीसींच्या भावना जाणून घ्यायच्या नाहीत, असा संताप हाके यांनी व्यक्त केला.

Laxman Hake
Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा वाजवणार..

ओबीसी आरक्षण कुणाचा बापही आला तरी संपवू शकत नाही, असे सांगत जरांगे यांनी आपल्या बॅनर वर तुतारीचे चिन्ह टाकून बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करावे, अशी टीका करत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात किंवा बॅनरवर फुले, शाहू, आंबेडकरांचा फोटो दिसतो का ? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com