Shahrukh Khan : समीर वानखेडेंनी वाढवले शाहरूख खानचे टेन्शन; आज बसला पहिला झटका

Shah Rukh Khan Delhi High Court latest news : समीर वानखेडे यांनी आरोप केला आहे की, या सिरीजमध्ये त्यांचं आणि ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचं चुकीचं आणि बदनामीकारक चित्रण करण्यात आलं आहे.
Shahrukh Khan, Samir Wankhede
Shahrukh Khan, Samir WankhedeSarkarnama
Published on
Updated on

बॉलिवूड बादशहा अभिनेता शाहरुख खानला मोठा झटका बसला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीस मान्यता दिली आहे. न्यायालयाने शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि इतर संबंधित कंपन्यांना समन्स जारी केले आहेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या नेटफ्लिक्सवरील 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजशी ही याचिका संबंधित आहे. समीर वानखेडे यांनी आरोप केला आहे की, या सिरीजमध्ये त्यांचं आणि ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचं चुकीचं आणि बदनामीकारक चित्रण करण्यात आलं आहे.

न्यायालयाने शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या असणाऱ्या रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि इतर संबंधित कंपन्यांना सात दिवसांच्या आत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

Shahrukh Khan, Samir Wankhede
Devendra Fadnavis Govt decision : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 5 लाख नोकऱ्यांसाठीचे धोरण तयार, हा आहे प्लॅन...

वानखेडे यांनी न्यायालयाकडे 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सिरीजच्या प्रसारणावर कायमस्वरूपी बंदी आणि दोन कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाईची रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, या प्रकारच्या सादरीकरणामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल आणि संस्थांबद्दल चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो.

Shahrukh Khan, Samir Wankhede
CJI Bhushan Gavai Security : भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा असलेल्या 'सरन्यायाधीशांना' मिळते 'ही' खास सुरक्षा; तैनात असतात इतके जवान

दरम्यान, 'या वेब सिरीजमध्ये ड्रग्ज विरोधी संस्थांचे नकारात्मक चित्रण केले गेले असून त्यामुळे जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो,” असा दावा वानखेडे यांनी केला आहे. त्यांचा आरोप आहे की आर्यन खान आणि त्यांच्या नावावर असलेले खटले मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस न्यायालयात प्रलंबित असताना ही सिरीज जाणीवपूर्वक प्रदर्शित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com