Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची खबरदारी घ्या; शंभुराजे देसाईंना कसली आलीय शंका?

Shambhuraj Desai Warned Against Chhagan Bhujbal Displeasure : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची पक्ष नेतृत्वाने खबरदारी घ्यावी, असा अलर्ट शिवसेनेचे नेते मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिला आहे. नाशिकच्या जागेवरून नाराजी असेल तर, ती जागा शिवसेनेचीच होती, असेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.
Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal
Shambhuraj Desai On Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Shambhuraj Desai News : शिवसेनेचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले. छगन भुजबळ नाराज असतील तर, त्यांच्या पक्ष नेतृत्वाने त्याची खबरदारी घ्यायला हवी. शंभुराजे देसाई यांनी खबरदार शब्दप्रयोग करून अजितदादांना एकप्रकारे अलर्ट केले आहे. हा विषय महायुतीच्या समन्वय समितीकडे आल्यास पाहू आणि आम्ही बोलू देखील, असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले.

महायुती भाजपबरोबर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून आहे. लोकसभेच्या खासदारकीपासून ते राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत त्यांना डावलण्यात आले आहे. यावरून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या महायुतीच्या बैठकीला देखील छगन भुजबळ गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांचे नाराजी अधिक गडद होत चालली आहे. छगन भुजबळ हे अजित पवार गटातील असेल तरी, महायुतीमधील ते ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीविषयी चिंता असल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal
Pankaja Munde News : पंकजा मुंडे भाजपऐवजी अपक्ष लढल्या असत्या तर विजय मिळाला असता; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

शिवसेनेचे (Shiv Sena) शंभुराज देसाई यांनी 'साम टीव्ही' राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा प्लॅनवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले. शंभुराजे देसाई म्हणाले, "छगन भुजबळ नाराज असतील तर, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. नाशिकच्या जागेवर नाराज असेल तर, ती जागा पूर्वीपासून शिवसेनेची होती. त्यामुळे ती आमचीच होती. ज्या पक्षाचा सिटींग खासदार, त्याचीच जागा असे असते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीचे काम नाही". पण भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या नाराजीबाबत पक्षनेतृत्वाने खबरदारी घ्यावी, असेही शंभुराजे देसाई यांनी म्हटले.

Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal
Video Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज! बैठकीला नाना पटोले जाणार नाहीत, विजय वडेट्टीवारांनाही निमंत्रण नाही

छगन भुजबळ यांच्या नाराजीचा विषय महायुतीच्या प्रमुख समन्वय समितीसमोर आल्यास आम्ही बोलू. अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या विषयात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार कुठून येतात. छगन भुजबळ काय वडेट्टीवार यांच्याशी बोलले का? विरोधी पक्षाला महायुतीत संभ्रम कसा होईल? एकमेकांकडे संशयाने कसे बघू? हे करायेच आहे. विरोधकांना देखील तेच हवे आहे. विरोधकांनी छगन भुजबळांच्या नाराजीची कितीही विषय पुढे आणू देत. पण, भुजबळ यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून, बॉडी लँग्वेजमधून ते नाराज असल्याचे मला तरी वाटत नाहीत, अशी टिप्पणी देखील शंभुराजे देसाई यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com