
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली गेली होती. अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात आडवा विस्तवही जात नाही. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता जवळपास दीड वर्षानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एका मंचावर येणार आहेत. पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात वितुष्ट आले होते. त्यानंतर झालेलया लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील काही सदस्यांनी तर एकमेकांच्या विरोधातही निवडणुका लढवल्या होत्या. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात काही कामानिमित्ताने बैठका होत गेल्या. त्यानंतर मधल्या काळात नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील दुरावा काहीसा दूर झाल्याचे सांगितले जात असतानाच आता उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीमधील नेटमंडळी एकच मंचावर येणार आहेत.
शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. धुवाळी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या (Ncp) दोन्ही गटाच्या नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला. धुवाळी यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. धुवाळी यांचं निधन झाल्याने त्यांच्या शोकसभेचे वाय. बी. सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत ही शोकसभा होणार आहे.
या शोकसभेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसह माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.
शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी म्हणून तुकाराम धुवाळी हे परिचित होते. शरद पवार हे गेल्या 60 वर्षापासून राजकारणात आहेत. तर धुवाळी यांनी 1977 पासून म्हणजे पवार यांना 53 वर्ष साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत धुवाळी हे शरद पवार यांची सावली बनून राहिले होते. त्यामुळेच त्यांचे पवार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंधही झाले होते. त्यामुळे धुवाळी यांच्या निधनानतंर होत असलेल्या या शोकसभेला दोन्ही गटाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.